सासऱ्यांनी दोन सुनांना घरी आणलं.... पण, तिसऱ्या दिवशीच अचानक गायब झाल्या अन् एका वर्षांनंतर... धक्कादायक खुलासा
दोन तरुणांनी नव्या नवरीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच, त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वर्षभरानंतर त्या महिलेला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासऱ्यांनी दोन सुनांना घरी आणलं

तिसऱ्या दिवशीच अचानक गायब झाल्या अन् एका वर्षांनंतर...

दोन्ही सुनांचा धक्कादायक खुलासा
Crime News: राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील ताराचंद जाट यांच्या दोन मुलांनी नव्या नवरीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच, त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वर्षभरानंतर त्या महिलेला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपी महिलेचं नाव काजल असून तिने बऱ्याच तरुणांशी लग्न करुन त्यांची मोठी फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. ती तिच्या कुटुंबियांसोबत मिळून श्रीमंत पण लग्न ठरत नसलेल्या तरुणांना फसवायची.
खोटं लग्न करुन तरुणांची फसवणूक
आता, या आरोपी महिलेची तरुंगात रवानगी करण्यात आली असून तिचे वडील, आई, बहीण आणि भावाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपीच्या शोधात मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने गुरुग्राम येथे पोहोचले आणि तिथे गल्ली नंबर दोनच्या एका घरातून तिला अटक करण्यात आली. आरोपी महिला अंकित नावाच्या व्यक्तीच्या भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, काजलचे कुटुंबीय मथुराच्या गोवर्धन येथील मूळ रहिवासी असून त्यांच्या जयपुर आणि सीकरसह बऱ्याच जिल्ह्यांमधील तरुणांसोबत खोटं लग्न करुन त्यांची फसवणूक करण्याचे आरोप करण्यात आले आहेत.
26 नोव्हेंबर 2024 रोजी सीकर जिल्ह्यातील दांतारामगढ पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणांनी तक्रार दाखल केली होती. याबाबत ताराचंद यांनी सांगितलं की, जयपुरमध्ये भगत सिंग नावाच्या व्यक्तीसोबत त्यांची ओळख झाली होती. तेव्हा भगतसिंगने ताराचंदला त्यांची दोन्ही मुलं भंवरलाल आणि शंकरलाल यांचं आपल्या मुली काजल आणि तमन्ना यांच्याशी लग्न लावून देण्याबाबत विचार करण्यास सांगितलं. लग्नाच्या तयारीच्या बहाण्याने भगतसिंगने ताराचंदकडून 11 लाख रुपये घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम लग्नाच्या खर्चासाठी आणि इतर तयारीसाठी असल्याचं सांगण्यात आलं होतं. ताराचंदवर विश्वास ठेवून त्यांनी पैसे दिले. 21 मे 2024 रोजी भगतसिंग त्यांच्या पत्नी सरोज, मुलगा सूरज आणि दोन मुली काजल तसेच तमन्ना यांच्यासोबत खाचरियावास येथील गोविंद रुग्णालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले.