मुंबई: आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग... मुलींनो तुमच्यासोबतही असं होऊ शकतं!

मुंबई तक

दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर त्या तरुणाने पीडितेला व्हिडीओ कॉल केला आणि नंतर तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. दुसऱ्याच दिवशी, आरोपी तरुणाने पीडितेच्या अश्लील व्हिडीओच्या आधारे तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांनी ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.

ADVERTISEMENT

अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग...
अश्लील व्हिडीओ अन् ब्लॅकमेलिंग...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवर तरुणीशी मैत्री केली अन्...

point

व्हिडीओ कॉलवर अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग

Mumbai Crime: मुंबईतील एका तरुणीला इंस्टाग्रामवर तरुणाशी मैत्री करणं महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर त्या तरुणाने पीडितेला व्हिडीओ कॉल केला आणि नंतर तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. दुसऱ्याच दिवशी, आरोपी तरुणाने पीडितेच्या अश्लील व्हिडीओच्या आधारे तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांनी ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या क्राइम ब्रांचने या घटनेतील दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे. 

तपासादरम्यान, पीडितेसोबत मैत्री करणाऱ्या तरुणाने स्वत: दिल्लीचा रहिवासी असून लंडनमध्ये व्यावसायिक असल्याची खोटी ओळख सांगितली असल्याचं समोर आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सतत पीडितेसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग करायचा आणि एके दिवशी तिला व्हिडीओ कॉल करून त्याने तरुणीचा अश्लील व्हिडीओ बनवला. 

हे ही वाचा: वाटेत अडवून तरुणीला घातली लग्नाची मागणी पण, पीडितेचा नकार अन् संतापलेल्या तरुणाने केलं भयंकर कृत्य!

अश्लील व्हिडीओ बनवला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला एका इंस्टाग्राम आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली आणि त्यानंतर, दोघांमध्ये चांगली ओळख झाली. दोघेही दररोज एकमेकांसोबत चॅटिंगवर गप्पा करायचे आणि एकमेकांचे घेतल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअॅपवर बोलणं सुरू झालं. मिळालेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर 2025 रोजी रात्री आरोपीने व्हिडीओ कॉलवर तरुणीला कपडे काढण्यासाठी भाग पाडलं आणि तिचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. दुसऱ्याच दिवशी, त्या तरुणाने स्वत: सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून पीडितेला तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी, आरोपीने तिच्याकडे 18 हजार रुपयांची मागणी केली आणि पीडितेने घाबरून आरोपी तरुणाच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले. 

हे ही वाचा: अजितदादांकडून खेचून आणून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं तिकीट दिलं, तोच माजी आमदार आता भाजपात प्रवेश करणार

पोलिसांच्या चौकशीत सगळं उघडकीस 

मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. काही दिवसांनंतर, आरोपीने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून पीडितेच्या वडील आणि भावाला तो व्हिडीओ पाठवला. त्यावेळी, तरुणाने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. भिवंडी येथील रहिवासी मोहम्मद शादाब मोहम्मद मुश्ताक अन्सारी या व्यक्तीच्या खात्यात पीडितेच्या कुटुंबियांनी पाठवलेली रक्कम जमा करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. प्राथमिक चौकशीमध्ये, आरोपी अन्सारीने मिळालेल्या रकमेतून क्रिप्टोकरन्सी खरेदी करुन ती परदेशात राहणाऱ्या चकस खान नावाच्या व्यक्तीला पाठवली असल्याचं उघडकीस आलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp