Diwali 2025: नरक चतुदर्शीला यम दिवा लावल्याने काय होतं? दिवा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
हिंदू मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी यम देवासाठी दिवा लावला जातो. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नरक चतुदर्शीला यम दिवा लावल्याने नेमकं काय होतं?

कधी साजरी होणार नरक चतुर्दशी?

या दिवशी दिवा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Narak Chaturdarshi 2025: दरवर्षी धनत्रयोदशीनंतर आणि लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी नरक चतुदर्शी साजरी केली जाते. पंचांगानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येते. यावर्षी, नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 19 ऑक्टोबर 2025 दुपारी 1:51 वाजेपासून 20 ऑक्टोबर 2025 ला दुपारी 3:44 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच, उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
श्रीकृष्णाकडून नरकासुराचा वध
दिवाळीत नरक चतुर्दशीचं देखील विशेष महात्म्य आहे. खरंतर, या दिवशी सकाळी सुर्योदयापूर्वी उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. याच दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्यातील चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सुमारे 16 हजार स्त्रियांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले. या आनंदानिमित्त दिवे लावून हा सण साजरा केला जातो. खरंतर, या दिवशी यम देवासाठी दिवा लावला जातो. या प्रथेमागे धार्मिक महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी यम दिवा लावल्यास कुटुंबातील सदस्यावरील अकाली मृत्यूपासून संरक्षण होतं.
यम दिवा लावण्याची योग्य पद्धत काय?
हिंदू मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी यम दिवा लावल्याने नरकात जाण्यापासून मुक्तता मिळते. यम देवासाठी दिवा लावल्यास यम देव प्रसन्न होतो आणि तो कुटुंबाचं रक्षण करतो. त्यामुळे दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी, यम दिवा लावणं शुभ मानलं जातं. शास्त्रांनुसार, यम दीपक नेहमीच दक्षिण दिशेला लावण्यात येतो. कारण ही दिशा यमराजाची मानली जाते. अनेक ठिकाणी तो घराच्या दारात देखील लावला जातो. खरंतर, या दिवशी गव्हाच्या पिठापासून चारमुखी दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिव्यात मोहरीचे तेल लावून चार वाती लावल्या जातात. चार वाती चारही दिशांना प्रकाश पसरवण्याचे प्रतीक मानले जाते.
छोटी दिवाळी
नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी, लावलेले दिवे नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणतात, असं मानले जाते. त्यामुळे, यम दिवा दक्षिण दिशेला ठेवण्यापूर्वी तो घरातील चारही कोपऱ्यांभोवती फिरवावा. असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. हे दिवे या सणाच्या पावित्र्याचे प्रतीक असल्याचं देखील सांगण्यात येतं.