प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण? इंटरनेटवर अचानक का होतंय सर्वात जास्त सर्च
premanand maharaj : प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण आहेत? इंटरनेटवर सर्वात जास्त होतंय सर्च
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण आहेत?

इंटरनेटवर सर्वात जास्त होतंय सर्च
premanand maharaj : मथुरा-वृंदावन येथील संत प्रेमानंदजी महाराज यांच्या प्रकृतीबाब सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या आरोग्याविषयीच्या बातम्यांमुळे संपूर्ण सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अलीकडेच एक अत्यंत भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वृंदावनधामातील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज हे दुसऱ्या एका संतांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की अखेर ते संत कोण आहेत, ज्यांच्याप्रती प्रेमानंद महाराज इतका आदर आणि भक्तीभाव व्यक्त करत आहेत.
खरं तर, ज्या संतांना पाहून प्रेमानंद महाराज स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता उभे राहिले, दंडवत नमस्कार केला, त्यांच्या स्वतःच्या हातांनी पाय धुतले आणि त्यांनाच आपल्या गादीवर बसवलं ते म्हणजे प्रेमानंदजींचे आध्यात्मिक गुरु आहेत. स्वतः आजारी असूनही त्यांनी केवळ वंदन केलं नाही, तर आपल्या गुरुंना सर्वतोपरी सन्मान देऊन त्यांना गादीवरही बसवलं. हे पाहून उपस्थित अनेक जण भावुक झाले आणि इंटरनेटवर या गुरुजींबद्दल माहिती शोधू लागले. तर जाणून घेऊ या की प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण आहेत, ज्यांच्याबद्दल सध्या सर्वजण जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?
भावनिक भेटीचा व्हिडिओ झाला व्हायरल
या व्हिडिओमध्ये दिसतं की गुरु शरणानंद महाराज, जे वृंदावनमधील रमणरेती महावन आश्रमाचे प्रमुख संत आहेत, ते प्रेमानंदजींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी केली कुंज आश्रमात आले होते. प्रेमानंदजींनी आपल्या गुरुंना पाहताच तात्काळ उठून साष्टांग दंडवत प्रणाम केला. त्यानंतर त्यांनी आपल्या गुरुंना गादीवर बसवलं, त्यांच्या पायांना पाणी घालून स्वच्छ केलं. पाय पुसले आणि आरती केली. या प्रसंगी दोन्ही संतांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि ही भेट पाहून आश्रमात उपस्थित सर्व भाविकांच्या डोळ्यांतही पाणी आलं.