परीक्षेला बसायला नको, मग विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्याच्या निधनाची अफवा पसरवली, पोलिसांत तक्रार दाखल
Fake death news of principal : परीक्षेला बसायला नको, मग विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्याच्या निधनाची अफवा पसरवली, पोलिसांत तक्रार दाखल
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

परीक्षेला बसायला नको, मग विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्याच्या निधनाची अफवा पसरवली

प्राचार्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल
Fake death news of principal : मध्य प्रदेशातील प्रतिष्ठित होळकर विज्ञान महाविद्यालयात बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोठा कट रचला. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली. त्यामुळे कॉलेजमध्ये मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. महाविद्यालय प्रशासनाने या अफवेची चौकशी सुरु केल्यानंतर हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचं समोर आलं. परीक्षा स्थगित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा खोडसाळपणा केला होता. दरम्यान, या प्रकरामुळे प्राचार्य संतापले असून त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, बीसीए तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी मयंक कछवाल आणि हिमांशू जयस्वाल यांनी प्राचार्यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. तपासानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवून शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता.
हेही वाचा : दोन पत्नींचा एकाच पतीसाठी एकत्र उपवास, पहिली बायको घरात असतानाही दुसरी आली अन्...
विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि सोशल मिडिया पोस्ट तपासल्या जाणार
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि सोशल मीडियावरील पोस्टची सखोल तपासणी सुरू आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा घटनांमुळे केवळ नियमभंगच होत नाही, तर विद्यार्थ्यांमधील शिस्त बिघडते. त्यामुळे या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने घेतले जात आहे.