दोन पत्नींचा एकाच पतीसाठी एकत्र उपवास, पहिली बायको घरात असतानाही दुसरी आली अन्...
Karwa chauth: एका व्यक्तीच्या दोन्ही बायकांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करून एकत्र उपवास केल्याची घटना समोर आली आहे. ज्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

आग्रा: देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये करवा चौथ हा एक सर्वात मोठा सण आहे. करवा चौथ हा प्रेम आणि भक्तीचा दिवस मानला जातो, परंतु यावेळी आग्र्यामधून एक फोटो समोर आला ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. येथे, रामबाबू निषाद या व्यक्तीच्या एक नव्हे तर दोन-दोन बायकांनी त्याच्या दीर्घायुष्यासाठी एकत्र उपवास केला. एवढंच नव्हे तर दोघींनीही एकत्र पूजा देखील केली. ज्याचा व्हिडिओ हा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

ही मनोरंजक घटना आग्रा येथील एतमदौला परिसरातील नागला बिहारी येथील आहे. रामबाबू निषादची पहिली पत्नी शीला देवी आणि दुसरी पत्नी मन्नू देवी या दोघीही त्याच्यासोबत राहतात. करवा चौथच्या दिवशी दोन्ही पत्नींनी एकत्र पूजा केली, चंद्राची प्रार्थना केली आणि पती रामबाबूच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडला. याचाच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं आहे.

10 वर्षांपूर्वी झालेलं लग्न
रामबाबू निषादची कहाणी ही काही कमी रंजक नाही. त्याचे पहिले लग्न सुमारे 10 वर्षांपूर्वी शीला देवीशी झाले होते आणि त्यांना मुलेही आहेत. काही काळानंतर, रामबाबूंचे मन्नू देवी हिच्याशी सूर जुळले आणि त्यांच्यात प्रेमही फुलले. सुरुवातीला, कुटुंबात जेव्हा ही बातमी समजली तेव्हा कोणताही कलह किंवा वाद झाला नाही. रामबाबूची पहिली पत्नी शीला हिने हे नवीन नाते सहजपणे स्वीकारले आणि कुटुंबात एक नवीन समजूतदारपणा निर्माण झाला. त्यानंतर, रामबाबूने मन्नू देवीशी एका मंदिरात लग्न केले.
रामबाबू म्हणतो, "जिथे प्रेम असते, तिथे मतभेदाला जागा नसते." त्यांच्या घरातील हे वातावरण दर्शवते की कौटुंबिक संबंध केवळ परंपरांपुरते मर्यादित नाहीत तर ते समजूतदारपणा, प्रेम आणि समर्पणाने देखील मजबूत केले जाऊ शकतात.