ATS चा अधिकारी असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्धाकडून 1.44 कोटी उकळले, पुण्यातील डिजिटल अरेस्टचं मोठं प्रकरण
पुण्यात एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सायबर भामट्यांनी तब्बल 1.44 कोटी रुपयांना गंडा घातल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ATS चा अधिकारी असल्याचं सांगून कोटी रुपयांना गंडा

70 वर्षीय वृद्धाकडून 1.44 कोटी उकळले

पुण्यातील डिजिटल अरेस्टचं मोठं प्रकरण
Pune Cyber Crime: पुण्यातून सायबर क्राइमचं एक मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला सायबर भामट्यांनी तब्बल 1.44 कोटी रुपयांना गंडा घातल्याची बातमी समोर आली आहे. आरोपींनी पीडित व्यक्तीला राष्ट्रीय तपास संस्था (ANI) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) चे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून 'डिजिटल अरेस्ट' करून तब्बल 1.44 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, सायबर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 23 सप्टेंबर रोजी मुंबईतील इन्स्पेक्टर म्हणून ओळख सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं.
दहशतवादी कारवायांसाठी बँक खात्यांचा वापर...
प्रकरणासंदर्भात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, अधिकाऱ्याने सांगितलं की, एटीएसच्या लखनऊ युनिटने एका दहशतवाद्याला अटक केली असल्याचं त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने पीडित वृद्धाला सांगितलं. त्या दहशतवाद्याने पीडित व्यक्तीच्या नावावर असलेल्या बँक खात्यांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला असल्याचा आरोपीने दावा केला.
हे ही वाचा: बीड हादरलं! ऐन दिवाळीत तरुणाचा छातीत गोळी लागून मृत्यू, हत्या की आत्महत्या? गुढ कायम
घाबरून 1.44 कोटी रुपये ट्रान्सफर केले
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नंतर, पोलिसांच्या वर्दीमध्ये असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने पीडित वृद्धाला व्हिडिओ कॉल केला आणि त्यावेळी एनआयए प्रमुख पुढील तपास करणार असल्याचं पीडित व्यक्तीला सांगण्यात आलं. दरम्यान, संबंधित वृद्धाला व्हिडीओ कॉल चालू ठेवण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर, पीडित व्यक्तीने घाबरून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या खात्यात 1.44 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
हे ही वाचा: उभं आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीत घालवलं, शरद पवारांमुळे माढ्याचे 6 वेळेस आमदार; पण आता पोरगा भाजपमध्ये जाणार
काही दिवसांनंतर म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी पीडित वृद्धाला पुन्हा 3 लाख रुपये जमा करण्यासाठी सांगण्यात आलं. मात्र, त्यावेळी या सर्व प्रकरणात काहीतरी गडबड वाटल्यामुळे पीडित वृद्धाने थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.