'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

Piyush Pandey passes away : 'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

Piyush Pandey passes away

Piyush Pandey passes away

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 04:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन

point

जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

Piyush Pandey passes away : 'अबकी बार मोदी सरकार' या घोषणेचे निर्माते आणि जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस पीयूष पांडे यांचं निधन झालंय. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांनी 'मिले सुर मेरा तुम्हारा' हे लोकप्रिय गाणं देखील लिहिलं होतं. पीयूष पांडे यांच्या निधनाची कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्यांना इन्फेक्शन झालं होतं आणि ते त्याविरोधात लढत होते. त्यांच्या मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

हे वाचलं का?

पीयूष पांडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं की, पीयूष पांडे त्यांच्या सृजनशीलतेसाठी ओळखले जायचे. जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं. त्यांच्याशी झालेले माझे संभाषण मी येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत आठवणीत ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. 

हेही वाचा : PSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
 

तरुण वयातच जाहिरात क्षेत्रात पदार्पण

पीयूष पांडे यांनी अवघ्या 27 व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी त्यांचा भाऊ प्रसून पांडे यांच्यासोबत करिअरची सुरुवात केली होती. दोघांनी मिळून दैनंदिन वापराच्या उत्पादनांसाठी रेडिओ जिंगल्सना आपला आवाज दिला होता. 1982 मध्ये त्यांनी ‘ओगिल्वी’ या नामांकित जाहिरात कंपनीत प्रवेश केला. 1994 मध्ये त्यांची कंपनीच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, तर 2024 मध्ये LIA लिजेंड अवॉर्ड मिळाला.

पीयूष पांडे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या 5 जाहिरातींबद्दल जाणून घेऊयात...

 1. फेविकॉलचा ‘ट्रकवाला’ जाहिरात (2007)

या जाहिरातीमध्ये साध्या डिंकाला अशा कल्पकतेने मांडण्यात आलं की ‘फेविकॉल’ हा शब्दच घराघरात प्रसिद्ध झाला. ट्रकमध्ये अनेक लोक बसलेले असतात आणि खडबडीत रस्त्यावरही कोणी पडत नाही. एवढ्या जबरदस्त पद्धतीने फेविकॉल चिटकवू शकतो, हे या जाहीरातीतून दाखवण्यात आलं होतं.  या मोहिमेला अनेक पुरस्कार मिळाले आणि ही जाहीरात प्रेक्षकांच्या मनात ती कोरली गेली.

2. कॅडबरीचा ‘क्रिकेटवाला’ जाहिरात (2007)

या जाहिरातीत भारतीय क्रिकेटवरील प्रेम सुंदरपणे दाखवलं आहे. एक मुलगा षटकार मारल्यावर आनंदाने नाचतो आणि संपूर्ण गल्ली त्याच्यासोबत आनंद साजरा करते. "कुछ खास है जिंदगी में!" ही ओळ लोकांच्या भावना जोडणारी ठरली आणि कॅडबरीसाठी ती ऐतिहासिक ठरली.

3. एशियन पेंट्सचा ‘हर घर कुछ कहता है’ (2002)

या जाहिरातीत एका कुटुंबाची भावनिक कथा दाखवली गेली, जिथे वडिलांच्या आठवणी घराच्या भिंतींवर जिवंत होतात.
"हर घर कुछ कहता है" ही टॅगलाईन लाखो कुटुंबांच्या मनाला भिडली आणि एशियन पेंट्सला मार्केट लीडर बनवले.

4. व्होडाफोन जाहिरात (2003)

या जाहिरातीत एक गोंडस कुत्रा एका मुलाला सतत फॉलो करत असतो. यामागे संदेश होता —“Wherever you go, Hutch is with you.” पांडे यांनी मोबाइल कनेक्टिव्हिटीला मैत्री आणि विश्वासाशी जोडले. “भाई, हच है ना!” हे डायलॉग्स घराघरात प्रसिद्ध झाले आणि त्या पगला राष्ट्रीय आयकॉन बनवले.

5. ‘अबकी बार मोदी सरकार’ (2014)

2014 च्या निवडणुकांसाठीचा प्रसिद्ध प्रचारवाक्य ‘अबकी बार मोदी सरकार’** हे देखील पीयूष पांडे यांची निर्मिती आहे. हे घोषवाक्य आजही प्रत्येकाच्या तोंडी आहे.

6. पल्स पोलियोचा ‘दो बूंदें जिंदगी की’

लोकांना पोलिओबाबत जागरूक करणाऱ्या या मोहिमेचंही श्रेय पांडे यांनाच जातं. ही मोहिम आजही लोकांच्या स्मरणात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बाप तो बाप रहेगा! शेतकरी बापाने लेकीसाठी 40 हजारांची नाणी बचत करत विकत घेतली स्कूटी, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

    follow whatsapp