Manoj Jarange Patil on Pankaja Munde, जालना : "पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याची पोस्ट पूर्वाश्रमीचे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली होती. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेतल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे काय काय म्हणाले? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये, मनोज जरांगेंची टीका
मनोज जरांगे पाटील म्हणाले, देशात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये. राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे चार तुकडे करण्याचे काम छगन भुजबळांनी करु नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेत. भुजबळ बीडला आले आणि भेद पसरवून गेले. मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? असा सवाल जरांगे यांनी भुजबळांना केलाय.
हेही वाचा : दीड महिन्यांपासून पत्नीचा पतीसोबत वाद, समजूत काढण्यासाठी तो आला घरी, स्वत:वर डिझेल ओतत घेतलं पेटवून
पंकजा वारसदार नाहीत तर मग वारसदार कोण? मनोज जरांगेंचा सवाल
दरम्यान, यावेळी मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवरही जोरदार निशाणा साधलाय. तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो, असं पंकजा मुंडेंची बाजू घेत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हटलय. मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली. आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं. हे खऱ्या वारसाला कळत नाही का? खरा वारस त्याच्यासोबतच हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खऱ्या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा वारसदार नाहीत तर मग वारसदार कोण? असा सवाल करत मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नुसती बहीण-बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही, त्यांनीही तुम्हाला आपलं समजायला हवं, असा टोलाही जरांगेंनी धनंजय मुंडेंना लगावलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उपचारासाठी तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावलं, तिला कपडे काढायला सांगितले, जबरदस्ती चुंबन करत नको तिथेच...
ADVERTISEMENT











