उपचारासाठी तरुणीला क्लिनिकमध्ये बोलावलं, तिला कपडे काढायला सांगितले, जबरदस्ती चुंबन करत नको तिथेच...

मुंबई तक

crime news : एका तरुणीने त्वचा रोग तज्ज्ञावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत. पीडित तरुणीने सांगितलं की, डॉक्टरने चौकशीच्या बहाण्याने संबंधित तरुणीचे लैंगिक शोषण केले.

ADVERTISEMENT

doctor sexually assaults girl
doctor sexually assaults girl
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरांनी तिला चुकीच्या पद्धतीने तिला हात लावत...

point

पीडितेला हॉटेलमध्ये रुम बूक करुन दोघांनीही...

point

मेडिकल समस्येचं कारण पुढं करत डॉक्टरांची नको तिच मागणी

Crime News : एका तरुणीने त्वचा रोग तज्ज्ञावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेत. पीडित तरुणीने सांगितलं की, डॉक्टरने चौकशीच्या बहाण्याने संबंधित तरुणीचे लैंगिक शोषण केले. पीडितेनं सांगितलं की, तरुणी आपल्या वडिलांसोबत अनेकदा रुग्णालयात येत होती. मात्र, एक दिवस तरुणीसोबत तिचे वडील न आल्याचा डॉक्टरांनी गैरफायदा घेत, पीडितेचं चुंबन घेतलं आणि तिचे कपडे काढण्यास तिला जबरदस्ती केली. संबंधित घटना ही बंगळुरु शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू

डॉक्टरांनी तिला चुकीच्या पद्धतीने तिला हात लावत...

या घटनेत डॉक्टर प्रवीण विरोधात पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेनं तक्रारीत नमूद केलं की,  ती डॉक्टरांच्या फोलोअपसाठी क्लिनिकमध्ये गेली होती असता, ही भयंकर घटना घडली. तरुणीने आरोप केला की, डॉक्टरांनी तिला अगदी चुकीच्या पद्धतीने तिला हात लावला. त्यानंतर 30 मिनिटांपर्यंत तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला अनेकदा गळाभेटही दिली, तिच्यासोबत अश्लील कृत्य करू लागला. 

पीडितेला हॉटेलमध्ये रुम बूक करुन दोघांनीही...

मुलीने सांगितलं की, डॉक्टरांनी तिला अनेकदा त्वचेचं संक्रमण झाल्याचे सांगत तिला चुकीचा स्पर्श केला. मुलीने आरोप केला की, मेडिकल समस्याचे कारण सांगत त्याने तिला कपडे काढण्यास सांगितले. डॉक्टर इथवर न थांबता त्याने पीडितेला हॉटेलमध्ये रुम बूक करुन दोघांनीही एकत्रितपणे वेळ घालवावा असे सांगितलं. 

हे ही वाचा : दिवाळीत बीड हादरलं! फटाके फोडताना झाला स्फोट, 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला मोठी इजा, नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर तरुणीने आपल्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली होती. पीडितेच्या नातेवाईकांसह नागरिकांनी क्लिनिक बाहेर एकत्रित होत डॉक्टरवर कारवाईची मागणी केली. याचक्षणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विरोध दर्शवला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून डॉक्टरला अटक करण्यात आली. डॉक्टरने आरोप फेटाळत दावा केला की, त्याने केलेल्या व्यवहाराला तरुणी चुकीचं समजून गेली.  

हे वाचलं का?

    follow whatsapp