दिवाळीत बीड हादरलं! फटाके फोडताना झाला स्फोट, 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला मोठी इजा, नेमकं काय घडलं?
Beed Crime : दिवाळी सणातच सायंकाळी 6 वर्षांचा मुलगा फटाके फोडताना फटाक्याचा स्फोट झाल्याने लहान मुलाची दृष्टी गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिवाळी सणाला गालबोट

बीडमध्ये फटाक्याचा स्फोट

लहान मुलाच्या डोळ्याला मोठी इजा

नेमकं काय घडलं?
Beed News : दिवाळी सण हा आनंदाचा उत्सव असतो, पण याच दिवाळी सणात फटाक्यांची आतिशबाजीने अनेक गंभीर अपघातही होतात. राज्यातील बीड जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळी सणातच सायंकाळी 6 वर्षांचा मुलगा फटाके फोडताना फटाक्याचा स्फोट झाल्याने लहान मुलाची दृष्टी गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यावर रानगव्याचा हल्ला, रक्तबंबाळ होईपर्यंत सोडलंच नाही, अखेर... हादरवणारा प्रकार
लहान मुलाने फटाका पेटवा अन् मोठा स्फोट झाला
21 ऑक्टोबर रोजी सोमवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील नागोबा स्ट्रीट येथील रहिवासी असलेला एक लहान मुलगा फटाके पेटवत होता, त्याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लहान मुलाने सुरुवातीला फटाका पेटवला असता, तो पेटलाच नाही. त्यानंतर लहान मुलाने दुसऱ्यांदा फटाके पेटवण्याचा प्रयत्न केला असता, मोठा स्फोट झाला. या घटनेनं ऐन दिवाळी सणातच लहान मुलाची दृष्टी गेल्यानं बीड शहर हादरून गेलं आहे.
डाव्या डोळ्याला गंभीर इजा
मुलाच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने मोठी दुखापत झाली. त्यानंतर लहान मुलाला बीडच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच प्रकरणात खासगी रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितलं की, फटाक्याच्या या स्फोटामुळे मुलाच्या कर्नियाचे नुकसान झाले असून एका डोळ्याची दृष्टी गेली आहे, मुले फटाक्यांसोबत खेळताना पालकांनी काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी आवाहन केलं आहे.
हे ही वाचा : भाऊरायाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेसाठीची शुभ-वेळ जाणून घ्या
दरम्यान, देशभरात दिवाळी सण साजरा केला जात आहे. देशभरातच फटाके फुटून मुलांना इजा झालेल्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशातच बीड शहरात फटाक्यामुळे झालेल्या स्फोटामुळे लहान मुलावर ही वेळ आली आहे.