भाऊरायाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेसाठीची शुभ-वेळ जाणून घ्या

मुंबई तक

Bhaubeej 2025 : : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 16 वाजता सुरु होईल.

ADVERTISEMENT

Bhaubeej 2025
Bhaubeej 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाऊरायाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता?

point

भाऊबीजेसाठीची शुभ-वेळ जाणून घ्या

Bhaubeej 2025 : हिंदू धर्मानुसार दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण मानला जातो. या सणाचा शेवटचा आणि सर्वात आत्मीयतेचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि नात्याची दृढता व्यक्त केली जाते. दरवर्षी हा सण कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरा केला जातो.

भाऊबीज 2025 तारीख आणि मुहूर्त

यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. द्वितीया तिथी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी सुरू होऊन रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी समाप्त होईल. भाऊबीजेच्या पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत राहील.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: मित्रासोबत बोलत असताना अचानक छातीत चाकू भोसकला अन्... CCTV मध्ये थरार घटना कैद

भाऊबीजेचे धार्मिक महत्त्व

भाऊबीज हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भाऊ आणि बहीण एकमेकांबद्दलचा स्नेह आणि आदर व्यक्त करतात. पुराणकथेनुसार, या दिवशी यम त्याची बहीण असलेल्या यमुनेकडे गेला होता. बहिणीच्या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन यमाने वर दिला की या दिवशी जे बहीण भाऊ एकत्र येऊन पूजा करतील त्यांना मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. असेही म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून द्वारकेत परत आल्यावर त्याची बहीण सुभद्रा हिने फुलं, मिठाई आणि दिवे लावून त्याचे स्वागत केले. तिने कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतरपासून भाऊबीजेचा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp