दीड महिन्यांपासून पत्नीचा पतीसोबत वाद, समजूत काढण्यासाठी तो आला घरी, स्वत:वर डिझेल ओतत घेतलं पेटवून
Viral News : ऐन दिवाळी पतीने घरात स्वत:लाचा पेटून घेतल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं परिसरा हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने स्वत:लाच पेटून घेतलं
दिवाळीच्या रात्री पती-पत्नीत काय घडलं?
Viral News : दिवाळी सणामुळे लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. पण, अनेकदा दिवाळी सणात अपघात झाल्याच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. ऐन दिवाळीत पतीने स्वत:लाच पेटून घेतल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अशा स्थितीत घटनास्थळी असलेल्या रहिवाशांनी संबंधित तरुणाला वाचवण्याचा प्रयत्नही केला. नागरिकांनी काही कपड्यांच्या मदतीने तसेच माती टाकून आग विझवली. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती देत तरुणाला रुग्णालयात दाखल केले, तिथून त्याला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रुग्णालयात तरुणावर उपचार सुरु असताना दुपारी उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव टिंकू असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू
पत्नीसोबत सुरु होता वाद
या प्रकरणात नंदग्राम उपासना यांनी सांगितलं की, टिंकू कुमार हा मूळचा मेरठ जिल्ह्यातील सरधना पोलीस ठाण्यातील बहादूरपूर गावातील रहिवासी होता. तो मजूर म्हणून काम करत असून गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी आणि मुलांसह नंदग्राम पोलीस ठाणे परिसरात राहत होता. टिंकूचा गेली दीड महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरु होता. यामुळे टिंकू अनेकदा घरापासून दूर राहू लागला होता आणि कधीतरीच घरी परतत असायचा.
स्वत:लाही पेटवून घेण्याची दिली धमकी अन्...
दिवाळी सणाच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत टिंकू आपल्या पत्नीची समजूत काढण्यासाठी घरी परतला होता. तेव्हा त्याने दार उघडण्यास सांगितले, पण तिने दार उघडण्यास नकार दिला. टिंकूने तिला घाबरवण्यासाठी डिझेलची बाटलीही सोबत आणली होती. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंकूने आरडाओरड केली असता, तिने दार उघडलेच नाही. नंतर स्वत:लाही पेटवून घेण्याची धमकी दिली. तरीही पत्नीने दार उघडण्यास नकारच दिला आणि पतीच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
हे ही वाचा : दिवाळीत बीड हादरलं! फटाके फोडताना झाला स्फोट, 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला मोठी इजा, नेमकं काय घडलं?
तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या टिंकूने डिझेल ओतून घेतले आणि स्वत:लाच पेटवून दिले. या घटनेचा एकूण धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.









