Solapur Politics : काही दिवसांपूर्वी सोलापुरातील चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार बोलून दाखवला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पडद्यामागून सूत्र हलवली आणि माजी आमदारांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचा 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची चिन्ह आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरात मित्र पक्षांना धक्के दिल्यानंतर आता अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवलाय.
ADVERTISEMENT
मंत्री दत्तात्रय भरणेंकडून सोलापुरात डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
सोलापुरात राष्ट्रवादीमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी आमदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सुरु झालीये. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे,कल्याण काळे, उमेश पाटील, मिनल साठे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेले आमदार पुत्र रणजित शिंदे ही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
सोलापुरातून भाजपमध्ये प्रवेश करणार असणारे नेते कोण?
राजन पाटील - मोहोळ - अजित पवारांची राष्ट्रवादी
यशवंत माने - मोहोळ - अजित पवारांची राष्ट्रवादी
दिलीप माने - दक्षिण सोलापूर - काँग्रेस
बबन शिंदे - माढा - अजित पवारांची राष्ट्रवादी
दीपक साळुंखे - सांगोला - ठाकरेंची शिवसेना
राजन पाटील अजित पवारांवर नाराज, पक्षाला रामराम
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांच्या पक्षात शिस्तभंगाच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी पक्षातील वाढत्या अव्यवस्थेचा दाखला देत अजित पवार गटाला रामराम केला आहे. राजन पाटील यांनी सांगितले की, “अजित दादा हे अत्यंत शिस्तप्रिय नेते आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, अलीकडच्या काळात पक्षात शिस्त हरवली असून गोंधळ आणि बेशिस्तपणा वाढला आहे.” त्यामुळेच आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
