कपलला अडवलं, खोट्या केसची धमकी देत लाच मागितली, पुढे असं काय घडलं की तीन पोलिसांनाच निलिंबित केलं?

हे जोडपं मुंबईहून ठाण्यात जेवणासाठी आलं होतं. या जोडप्याला पोलिसांनी अडवलं आणि त्रास द्यायला सुरूवात केली. त्यानंतर या कपलला पैसेही मागितले.

Mumbai Tak

मुंबई तक

04 May 2025 (अपडेटेड: 04 May 2025, 09:26 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनीच केला मोठा गुन्हा

point

रस्त्याने जाणाऱ्या कपलला अडवून दिला त्रास

point

जोडप्याकडून घेतली तब्बल 50 हजारांची लाच

Thane Crime News :  रस्त्याने जाणाऱ्या, एखाद्या निवांत ठिकाणी बसलेल्या प्रेमी युगुलांना पकडून त्यांच्या कारवाई झाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. यामध्ये अनेकदा नाहक त्रास दिला जात असल्याचंही दिसतं. ठाण्यात अशीच एक घटना घडली. एका जोडप्याकडून पोलिसांनी पैसे उकळले. मात्र, इथे पैसे उकळल्याच्या आरोपाखाली तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. शुक्रवारी, 2 मे रोजी ही कारवाई करण्यात आली.पोलिसांचं वर्तन पोलीस दलाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे पोलिस विभागाची प्रतिष्ठा खराब झाली अशा आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी य़ा कपलला पकडून त्यांना ब्लॅकमेल करत पैसे उकळले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 'शिर्डीचं साई संस्थान पाईप बॉम्बने उडवून टाकू', धमकी अन् भक्तांमध्ये भीतीचे वातावरण

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निलंबित पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल जयेश अंबिकर, राकेश कुंटे आणि सोनाली मराठे यांचा समावेश आहे. 30 एप्रिलच्या रात्री ठाण्याच्या तळावपाली परिसरात एका जोडप्याला बेकायदेशीरपणे थांबवून पोलrस एस्कॉर्ट वाहनाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

प्रकरण नेमकं काय? 

हे जोडपं मुंबईहून ठाण्यात जेवणासाठी आलं होतं. पोलिसांनी त्यांच्यावर अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा खोटा आरोप केला. पोलिसांनी त्यांना धमकावलं आणि त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मागण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या जोडप्याशी गैरवर्तन केलं, त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाणही केली असा आरोप आहे.


हे ही वाचा >> Maharashtra Weather : पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये हलका पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना बसणार वादळाचा तडाखा!

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कॉन्स्टेबलने जोडप्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत आणि लाच मागितली. दबाव आणि अटकेच्या भीतीपोटी, या जोडप्याने आधी ऑनलाइन  40,000 रुपये ट्रान्सफर केले. नंतर एटीएममधून 10,000 रुपयेही काढून दिले.

दरम्यान, या घटनेनंतर लगेचच, जोडप्याने नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीनंतर असं आढळून आलं की, तिन्ही पोलिसांनी फक्त पदाचा गैरवापरच केला नाही, तर विभागीय आचारसंहितेचंही उल्लंघन केलं आहे.

ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'तपासात, तिन्ही पोलिसांची भूमिका चुकीची असल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. विभागीय शिस्तभंगाची कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे.'

    follow whatsapp