ग्रामीण भागात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न करा – मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना आदेश

मुंबई तक

• 10:41 AM • 23 Jun 2021

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षाच्या तयारीला लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आता कमी झाले आहेत त्या गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठीचे प्रयत्न करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. राज्यातील दहावी-बारावीच्या वर्गांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षाच्या तयारीला लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आता कमी झाले आहेत त्या गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठीचे प्रयत्न करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

हे वाचलं का?

राज्यातील दहावी-बारावीच्या वर्गांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला शिक्षण मंत्री व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ज्या गावांमध्ये आता रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे आणि ज्या गावांनी भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत यासाठी काळजी घेतलेली आहे अशा गावांमध्ये दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न करा असे आदेश दिले आहेत.

दरम्यान शालेय शिक्षण विभागाने या बैठकीत कोरोनामुळे पालकांचं छत्र गमावलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या बैठकील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणारा खर्च आणि संपूर्ण प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    follow whatsapp