Manikrao Kokate : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि सिन्नरचे आमदार म्हणून माणिकराव कोकाटेंची एक ओळख निर्माण झाली आहे. ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले असून सध्या ते चर्चेचा विषय ठरत आहेत. एका कारणाने सध्या ते प्रचंड अडचणीत आले आहेत. आज पार पडलेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार देखील करण्यात आली, नंतर फसवणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती देखील सांगितली होती. या प्रकरणात पार पडलेल्या सुनावणीत त्यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात कोकाटेंची आमदारकी धोक्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात कोचिंग सेंटरमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याकडून मित्रावर चाकूने वार करत संपवलं, शिक्षकासमोर भयंकर घडलं
कोण माणिकराव कोकाटे?
सुरुवातीला माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेस पक्ष, नंतर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा चारही पक्षात प्रवेश केला होता. पण यापैकी तीन पक्षांतून निवडणूक लढवली होती आणि नंतर ते जिंकून आले होते. माणिकराव कोकाटे हे सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आले असून त्याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.
ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
गेली 20 वर्षात त्यांनी अनेक पक्षातून कामं केली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपमध्ये होते, त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांना सिन्नरमधून तिकीट देखील देण्यात आले होते आणि चौथ्यांदा विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांचा हात धरला. नुकत्याच झालेल्या 2024 मधील विधानसभा निवडणुकीत 41 हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले होते.
हे ही वाचा : बुरखा न घालताच मुलांसह पत्नी माहेरी गेली, पतीनं थेट गोळी झाडून संपवलं, नंतर मृतदेह घरातच पुरले
शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि पक्षात प्रवेश
कोकाटे हे मूळचे काँग्रेसी होते. नंतर 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला होता. तेव्हा पक्षाने त्यांना सिन्नरमधून उमेदवारी दिली नव्हती. माणिकरावांना पर्याय म्हणून तुकाराम दिघोळे यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आल्यचे सांगण्यात येतं. ते याआधी शिवसेनेकडून दोन वेळा आणि काँग्रेसकडून एकदा आमदार म्हणून विजयी झाले होते. जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं, त्यात काही आमदार होते त्यापैकी माणिसराव कोकाटेंचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











