'आयुष्यभर तुमच्यासोबत..', विदीप जाधवांच्या पत्नीचं सांत्वन करताना सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 03:26 PM)

Sunetra Pawar meets Videep Jadhav family : बारामती येथील विमान अपघातात साताऱ्यातील तरडगावच्या विदीप जाधव यांनी देखील जीव गमावला होता. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून सेवा बजावत होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीची भेट घेतलीये. सूनेत्रा पवार सांत्वन करताना काय म्हणाल्या? हे विदीप जाधव यांच्या पत्नीने स्वत: सांगितलंय.

Sunetra Pawar meets Videep Jadhav family

Sunetra Pawar meets Videep Jadhav family

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'तुमचे मिस्टर शेवटपर्यंत दादांसोबत..',

point

विदीप जाधवांच्या पत्नीचं सांत्वन करताना सूनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO

Sunetra Pawar meets Videep Jadhav family : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा बारामती येथे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. यामध्ये साताऱ्यातील तरडगावच्या विदीप जाधव यांनी देखील जीव गमावला होता. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून सेवा बजावत होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीची भेट घेतलीये. सूनेत्रा पवार सांत्वन करताना काय म्हणाल्या? हे विदीप जाधव यांच्या पत्नीने स्वत: सांगितलंय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : बीड : पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; साडेतीन वर्षांच्या मुलासह आईची विहिरीत उडी, दोघांचाही करुण अंत

विदीप जाधव यांच्या पत्नी म्हणाल्या, शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहणार असं त्यांनी सांगितलं. माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते. त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही आणि दादांनीही कधीच त्यांना अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीसोबत माझ्याबरोबर आयुष्यभर राहाणार आहेत. माझ्या मुलांकडे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्याचं लक्ष राहिलं. आता आमचं नातं घरच्यासारखं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. माझं आणि त्यांचं दु:ख सारखंच आहे, माझं सर्वस्व गेलंय, तसंच त्यांचंही गेलंय. तरीही त्या उभ्या आहेत, त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय. त्या माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील. 

विदीप जाधव हे आपल्या कामाबाबत अत्यंत निष्ठावान आणि जबाबदार अधिकारी म्हणून ओळखले जायचे.  अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलातही तीव्र शोक व्यक्त करण्यात येतोय. वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि मित्रांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्घटनेनंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातूनही शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील तरडगाव गावावर शोककळा पसरली असून, गावातील प्रत्येक नागरिक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एकत्र आयुष्य संपवण्याचं प्रेयसीला आश्वासन... विवाहित प्रियकराने भयंकर पद्धतीने काढला काटा! नेमकं काय घडलं?