अजितदादांसोबत OSD का नव्हता? दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं? मला घातपाताची शंका; मिटकरींचे 7 मोठे प्रश्न

Amol Mitkari on Ajit Pawar death and Baramati plane Crash : "अपघातानंतर विमातळावर जी कागदपत्र पडली, ती देखील कुठेच जळताना दिसली नाहीत. अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी त्या स्पॉटवर गेलो होतो. मी बारकाईने निरीक्षण केलं. कागद जळालेला दिसत नाही. शिवाय, अजितदादांची बॉडी हातातील घड्याळामुळे ओळखता आली. जे घड्याळ अजितदादांचं शेवटची ओळख बनलं, ते घड्याळ कुठं गेलं? याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही. कारण ती त्या बॉडीच्या हातात नव्हती"

Amol Mitkari on Ajit Pawar death and Baramati plane Crash

Amol Mitkari on Ajit Pawar death and Baramati plane Crash

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 04:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादांसोबत OSD का नव्हता? दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं?

point

मला घातपाताची शंका; मिटकरींचे 7 मोठे प्रश्न

Amol Mitkari on Ajit Pawar death and Baramati plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा बारामती येथे 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल शंका व्यक्त केली होती. मात्र, खासदार शरद पवारांनी हा अपघातच आहे, असं ठणकावून सांगितलं होतं. दरम्यान, विमान अपघातानंतर चार दिवसांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांसोबत घातपात झाल्याच्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याबाबतही भाष्य केलंय. ते न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. अमोल मिटकरी यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

EASA ने बंदी घातलेलं विमान अजितदादांना का दिलं गेलं? - मिटकरी 

अमोल मिटकरी म्हणाले, EASA ज्या विमान कंपनीवर बंदी आणली होती. याबाबत 5 वेळा स्मरणपत्र पाठवण्यात आली होती. विमानावर बंदी घातल्याचा प्रस्ताव युरोपियन UNION ने DGCA कडे पाठवला होता. मग असं असताना अजित पवारांसाठी हेच विमान का दिल्या गेलं? 

दादांची ओळख बनलेलं घड्याळ कुठं गेलं? 

अपघातानंतर विमातळावर जी कागदपत्र पडली, ती देखील कुठेच जळताना दिसली नाहीत. अंत्यसंस्कारानंतर संध्याकाळी त्या स्पॉटवर गेलो होतो. मी बारकाईने निरीक्षण केलं. कागद जळालेला दिसत नाही. शिवाय, अजितदादांची बॉडी हातातील घड्याळामुळे ओळखता आली. जे घड्याळ अजितदादांचं शेवटची ओळख बनलं, ते घड्याळ कुठं गेलं? याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही. कारण ती त्या बॉडीच्या हातात नव्हती. 

मेडे कॉल का केला नाही? विमान पुण्याला किंवा सोलापूरला लँड का केलं नाही? 

जबाबदार माणसाने सांगितलं की, धुकं होतं म्हणून त्यांनी एमरजन्सी लँड केलं. मात्र, स्पष्ट दिसतंय की, धुकं नव्हतं. कारण लख्ख सूर्यप्रकाश होता. कारण प्रत्यक्षदर्शी तेथे होते, मॉर्निकवॉक करणारे लोक तेथे होते. विमान दोन कलट्या खातंय. विमानात इंधन मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे दोन घिरट्या मारायला त्याला वेळ गेला नसता. सोलापूर विमानतळ जवळ होतं, पुणे विमानतळ जवळ होतं. त्याने मेडे कॉल पण शेवटचा केला नाही. या अपघाताच्या बाबतीत मला प्रचंड शंका निर्माण झाल्या. त्या मी सविस्तरपणे मांडल्या. महाराष्ट्र देखील आज त्याचा जाब विचारतोय. संजय राऊत साहेबांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मी आमदार म्हणून याबाबतची चर्चा करण्यासाठी बसलेलो नाही. मी अजितदादांना माणणाऱ्या लाखो चाहत्यांच्या वतीने माझी भावना मांडतोय. याला आपण पॉलिटिकल अंग देऊ नये. अजितदादांसारख्या मोठ्या नेतृत्वाचा, माणसाचा क्षणार्धात कोळसा होत असेल आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात काहूर असेल.. काहूर कसा आहे? तर तांत्रिक बिघाड होता, हे बाह्य कारण दिल्या गेलं. तर लँडिंगच्या वेळी विमान  एका बाजूला का कलंडलं? मी जनतेच्या मनातील प्रश्न मांडतोय. 

ब्लॅक बॉक्स मधील डेटा सार्वजनिक कधी करणार आहात?

संबंधित गावचे सरपंच म्हणतात विमानाचा आवाज अचानक बदलला. इंजिन फेअलर होत का? इंधन गळती की इतर काही होतं? विमान पडल्यानंतर चार-पाच सेकंदांनी काही स्फोट झाले आहेत. मग विमानात स्फोटकं वगैरे होती का? माझं म्हणणं आहे की, ब्लॅक बॉक्स मधील डेटा सार्वजनिक कधी करणार आहात? तो डेटा जोपर्यंत सार्वजनिक होत नाही, तोपर्यंत या शंका दूर होणार नाहीत. 

अजितदादांसोबत OSD का नव्हता? मिटकरीेचा सवाल 

अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओक्साबोक्सी रडत होते. ते फार संवेदनशील आहेत. त्यांनी या अपघात प्रकरणात जातीने लक्ष घातलंय. माझं मत आहे की, ब्लॅक बॉक्समधील डेटा पटकन सार्वजनिक करावा. लोकांच्या शंका दूर कराव्यात. जे प्रवासी जीवंत होते, ते खरोखरच बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते का? अजितदादा मुंबईतून निघाले तेथील सीसीटीव्ही समोर आला पाहिजे. कारण मला माहिती मी जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत प्रवास केलाय. तेव्हा अजितदादांसोबत त्यांचा ओएसडी असतो. ओसडी असतो किंवा पीएस असतो. यावेळेस कोणीच नव्हतं. विदीप जाधव एकटेच होते. हा देखील शंका घेण्यासारखा विषय आहे. 

दुसरी गोष्ट पहिल्या दिवशीचा जो दादांचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये दुपारी दोन नंतर कोणाच्या भेटीगाठीच नाहीयेत. म्हणजे पूर्ण दिवस दादा मोकळे होते. दादा असे मोकळे कधी थांबत नव्हते. हे सर्वांना माहिती आहे. ही घटना घडली 28 जानेवारीला...आणि 27 जानेवारीचा कार्यक्रम पाहिला तर दुपारी 2 पर्यंत लोकांच्या भेटीगाठी आहेत आणि मंत्रालयीन कामकाज आहे. त्यानंतर पक्षातील लोकांना दादा भेटल्याचं मला कळलं. 

जोपर्यंत ब्लॅकबॉक्समधील डेटा आणि संभाषण सार्वजनिक होत नाही, तोपर्यंत त्याबद्दल मी साशंक आहे. माझं वैयक्तिक मत विचाराल तर धुक्यापेक्षा धोका जास्तय असं माझं मत आहे...अर्थात हे आमदार म्हणून किंवा पक्षाचं मत नसेल. पण अजितदादांच्या लाखो चाहत्यांपैकी एकाचं हे मत आहे.. हे नक्की.. हा अपघात टाळता येण्यासारखा होता, ही दुर्घटना घडली नसती. मेडे कॉल का केला गेला नाही? पायलटला धावपट्टी दिसत नव्हती तर त्याने टेक ऑफ का केल नाही? इंधनसाठा होता, त्याला पुण्याला जाणं सहज शक्य होतं. काही लोकांनी दादांना सोलापूरला लँड होऊन चॉपरने पुण्याला येण्याचा सल्ला दिला होता. दादाने काय बारामतीत पहिल्यांदा प्रवास केलाय का? असंख्य प्रवास दादांचे त्याठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे मला घातपाताची शंका आहे. 

ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी पवार साहेब दिल्लीला होते, त्यांनी आल्यानंतर घटना कुठे घडली? याची चौकशी केली. महाराष्ट्रात वातावरण सुन्न झालेले होतं. शेवटी ते बाप माणूस आहेत, पोटचा मुलगा गेला होता. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांचं स्टेटमेंट आलं होतं. त्यामुळे लोकांच्या भावना, गर्दी कंट्रोल करणे.. लोकांना जास्त धक्का बसू नये, म्हणून..कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवारांनी अपघाता दिवशी भूमिका घेतली होती. मात्र, मला विश्वास आहे, हळूहळू साहेबांना या गोष्टी लक्षात येतील. मी देखील या विषयावर चार दिवसांनी बोललोय. कारण आमच्या घरी अजूनही सुतक पडल्यासारखं वातावरण आहे. 

    follow whatsapp