Mumbai News: बहुप्रतिक्षित कर्जत-पनवेल रेल्वे लाइनचं काम लवकरच पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कर्जत-पनवेल मार्गिकेवर उपनगरीय लोकल सर्व्हिस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रोजेक्टसाठी डोंगरातून एक बोगदा बांधण्यात आला आहे. या मार्गावर बऱ्याच काळापासून काम सुरू आहे. आता, किरवली-वांजळे गावाजवळ या 300 मीटर लांब बोगद्याचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती आहे. या बोगद्यात ट्रॅक टाकण्याचं काम अद्याप पूर्ण झालं नसून टनलचं बांधकाम पूर्ण झाल्यामुळे या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
ADVERTISEMENT
पनवेल-कर्जत दरम्यान नवी मार्गिका
2005 मध्ये बांधण्यात आलेला जुना हलीवली बोगदा ठिसूळ झाला असून त्यात दगड कोसळत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, ही मार्गिका रेल्वे आणि लोकल ट्रेनसाठी सुरक्षित नव्हती. यासाठी सेंट्रल रेल्वेने पनवेल-कर्जत दरम्यान एक नवी आणि सुरक्षित मार्गिका बनवण्याचा निर्णय घेतला. चौक ते कर्जत हा पूर्णपणे नवीन मार्ग आणि पनवेल ते चौक हा जुना मार्ग वापरून हा प्रोजेक्ट तयार केला जात आहे.
या नव्या मार्गिकेवर कर्जत तालुक्यात किरवली आणि वांजळे गावाच्या हद्दीत एक मोठा बोगदा बांधण्यात आला आहे. डबल लेनसाठी हा बोगदा मोठ्या जागेत बांधला जात आहे. भविष्यातील वाढती ट्रॅफिक लक्षात घेता हा बोगदा बांधण्यात आला आहे. या बोगद्याचं एक टोक किरवली गावात असून दुसरं टोक वांजळे गावात आहे. या बोगद्यानंतर, कर्जत-कल्याण स्टेट हायवे सुरू होतो, ज्यावर एक फ्लायओव्हर आधीच सेवेत आहे.
हे ही वाचा: Govt Job: एअरपोर्टवर नोकरी हवीये? मग, या भरतीसाठी आत्ताच करा अप्लाय! पगार तर...
कर्जत-पनवेल रेल्वे रूट लोकल सर्व्हिससाठी तयार
या नवीन रेल्वे मार्गिकेमुळे रस्ते वाहतुकीत अडथळा येणार नाही. बोगद्याचे बांधकाम पूर्ण झालं असून ट्रॅक सुद्धा तयार आहे. त्यामुळे, कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग आता उपनगरीय सेवेसाठी सज्ज आहे. टनलचं बांधकाम पूर्ण झालं असून रेल्वे ट्रॅकसुद्धा टाकण्यात आले आहेत. अशातच, आता कर्जत-पनवेल रेल्वे रूट लोकल सर्व्हिससाठी तयार आहे.
कर्जत ते नवी मुंबई पोहोचण्यासाठी प्रवाशांना दररोज ठाण्याहून अतिशय गर्दीत प्रवास करावा लागतो. आता, डोंगरातून बांधण्यात आलेल्या या मार्गावरील अधिक सुरक्षित, जलद आणि अधिक विश्वासार्ह बनेल. कर्जत, पनवेल आणि आसपासच्या परिसरातील हजारो प्रवाशांसाठी ही दिलासाजनक बाब आहे. हा रेल्वे रूट आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून कर्जत-पनवेल ट्रेन सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे.
ADVERTISEMENT











