नारायण राणे पोलीस ठाण्यात हजर राहा! नितेश राणे प्रकरणात नोटीस

सिंधुदुर्गातल्या नितेश राणे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरण यासंदर्भात नितेश राणेंना अटक करण्याची मागणी होते आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:43 AM • 29 Dec 2021

follow google news

सिंधुदुर्गातल्या नितेश राणे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

हे वाचलं का?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरण यासंदर्भात नितेश राणेंना अटक करण्याची मागणी होते आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अधिवेशनातही हा मुद्दा समोर आला होता. तीन दिवस नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत हे कुणालाच माहित नाही.

नितेश राणे यांच्या अटकेची मागणी का होतेय? नेमकं प्रकरण काय?

पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस नारायण राणेंना बजावण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहा असं या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नोटिशीवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नितेश राणेंबाबत नारायण राणेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नितेश राणे कुठे आहेत? हे मला माहिती नाही मी ते तुम्हाला का सांगू? असा प्रश्नही नारायण राणेंनी केला होता. या प्रश्नाचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण यांना नितेश राणेंसंदर्भात माहिती तर नाही ना? असाही होत होता. याच संदर्भात पोलिसांनी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यासंदर्भात विचारणा करत नोटीस बजावली आहे.

कणकवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कलम 307, 120 ब आणि 34 या गुन्ह्यात नितेश राणे हे आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अथक प्रयत्न करूनसुद्धा ते मिळून येत नाहीत त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. असे पोलिसांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीशीमध्ये म्हटलं आहे.

    follow whatsapp