मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
शिवसेनेसोबत बंडखोरी करत जळगाव जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे. मात्र राजकारणात सक्रिय नसलेल्या त्यांच्या भगिनी म्हणजेच वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत हे म्हणत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. जळगावातल्या या राजकारणाची चर्चा आता चांगलीच होते आहे. आमदार किशोर पाटील हे बंड करत एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. भाऊ एकनाथ शिंदेंच्या सोबत तर बहीण उद्धव ठाकरेंसोबत असं चित्र जळगावात दिसतं आहे. त्यामुळे या राजकारणाची चर्चा रंगली आहे.
आम्ही मातोश्रीचाच आदेश मानणार असं वैशाली पाटील यांनी केलं जाहीर
पाचोरा येथील दिवंगत उद्योगपती आमदार आर .ओ पाटील हे बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात. २५ वर्षे सतत शिवसेने सोबत राहून दोन वेळेस सतत शिवसेनेचे आमदार राहिलेले आर .ओ तात्या पाटील यांना मुलगा नसल्याने राजकीय वारसदार म्हणून आपल्या पुतण्याला त्यांनी पुढे करून शिवसेनेत दोन वेळेस आमदार केलं.
मात्र आता पाचोरा येथील आमदार किशोर पाटील (Kishor Patil) हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने, आर .ओ पाटील यांच्या एकुलत्या एक मुलीला तीव्र दुःखद वेदना सहन कराव्या लागल्या. गुवाहाटीला आमदार किशोर पाटील गेले होते. तेव्हा त्यांना वारंवार फोन करूनही न ऐकल्याने शेवटी दिवंगत वडिलांनाचा ठाकरे कुटुंबातील आणि मातोश्रीशी असलेला जिव्हाळा या पुढेही आपण कायम ठेवावा याच उद्धेशाने उद्योग सांभाळत असलेल्या वैशालीने पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्धव ठाकरेंना शुभेच्या देऊन उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत बंडखोर भावाच्या विरोधात बंड केल्याचं समोर आलं आहे.
यापुढेही उद्धव ठाकरेंचा आदेशच आम्ही पाळू असे वैशाली पाटील मुंबई तकशी बोलताना म्हणाल्या. त्या करीता बंडखोर आमदार भावा विरोधातही लढावे लागले तरी ठीक पण उद्धव ठाकरेंचा भगवाच या पुढे पाचोरा मतदार संघात फडकणार असे संकेत वैशाली पाटील यांनी दिलेत.
शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाला आव्हान देणाऱ्यांत किशोर पाटील
एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला बंड पुकारत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीला २७ आमदार होते. त्याची संख्या आता ४० झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे १२ खासदारही एकनाथ शिंदे गटासोबत आले आहेत. या सगळ्या परिस्थितीत पक्ष सावरण्याचं काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करताना दिसत आहेत. मात्र ही पडझड अद्यापही थांबलेली नाही असंही दिसून येतं आहे. शिंदे-ठाकरेंची लढाई सुप्रीम कोर्टातही गेली आहे. आता जळगावातल्या राजकारणाची चर्चा मात्र चांगलीच होताना दिसते आहे. चुलत भावाच्या विरोधातली भूमिका त्याच्या बहिणीने घेतली आहे. आपण उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा देणार असं वैशाली सूर्यवंशी यांनी जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
