महाराष्ट्रात दिवसभरात २४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण, रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या खाली

मुंबई तक

• 03:28 PM • 22 Mar 2021

दिवसभरात महाराष्ट्रआात २४ हजार ६४५ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर चोवीस तासात १९ हजार ४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात राज्यात ५८ कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या २.१३ टक्के इतका झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या १ कोटी ८४ लाख ६२ हजार ३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ […]

Mumbaitak
follow google news

दिवसभरात महाराष्ट्रआात २४ हजार ६४५ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर चोवीस तासात १९ हजार ४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात राज्यात ५८ कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या २.१३ टक्के इतका झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या १ कोटी ८४ लाख ६२ हजार ३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ४ हजार ३२७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण २२ लाख ३४ हजार ३३० कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात २ लाख १५ हजार २४१ अॅक्टिव्ह रूग्ण आज घडीला आहेत.

हे वाचलं का?

कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

नागपूर : लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली, शिक्षक बनला ड्रग्ज तस्कर

सध्या राज्यात १० लाख ६३ हजार ७७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ११ हजार ९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या २५ लाख ४ हजार ३२७ इतकी झाली आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या ५८ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू मागील ४८ तासातील आहेत. तर सहा मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू पुणे २, औरंगाबाद २, गोंदिया २, ठाणे १, नांदेड १, असे आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई – २३ हजार ६७१

ठाणे – २० हजार ६६३

पुणे – ३९ हजार ४९२

नाशिक- १६ हजार ३५

अहमदनगर- ४ हजार ५९६

जळगाव-६ हजार ५३१

औरंगाबाद- १४ हजार ८७

बुलढाणा- २ हजार ७२७

अकोला- ५ हजार ४६४

नागपूर- ३१ हजार ४२९

पुण्यात आणि नागपुरात सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यातल्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३९ हजारांच्या वर गेली आहे तर नागपुरातली ३१ हजारांच्या वर गेली आहे.

    follow whatsapp