पुण्यात दिवसभरात ३ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह, ३१ रूग्णांचा मृत्यू

मुंबई तक

• 02:54 PM • 23 Mar 2021

पुण्यात दिवसभरात ३ हजार ९८ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात पुण्यात ३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात १६९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ५५५ रूग्ण असे आहेत ज्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात आजवर २ लाख ४० हजार ८३४ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजवर पुण्यात २ लाख ११ हजार ३०४ रूग्ण […]

Mumbaitak
follow google news

पुण्यात दिवसभरात ३ हजार ९८ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात पुण्यात ३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात १६९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ५५५ रूग्ण असे आहेत ज्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

पुण्यात आजवर २ लाख ४० हजार ८३४ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजवर पुण्यात २ लाख ११ हजार ३०४ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, आज घडीला पुण्यात २४ हजार ४४० रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत पुण्यात एकूण ५ हजार ९० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध; पाहा काय सुरु, काय बंद

आज केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोना चाचण्यांची संख्य़ा देशातल्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त करावी अशी महत्त्वाची सूचना करत MHA ने नव्या गाईडलाईन्स लागू केल्या आहेत. RT-PCR टेस्टचं प्रमाण हे ७० टक्के किंवा त्याहून अधिक असलं पाहिजे. नवे कोरोना रूग्ण, त्यांच्या उपायांची, आयसोलेशनची व्यवस्थाही तातडीने करण्यात यावी असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने लागू केलेल्या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

या गाईडलाईन जरी आज आल्या असल्या, तरीही टेस्टिंगबाबत जेव्हा राजेश टोपे यांना सोमवारी विचारण्यात आलं होतं तेव्हा महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच टेस्टिंग सुरू आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी रूग्ण संख्या वाढत आहे याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली होती. पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे निर्बंध लादण्यात आले आहेत.

    follow whatsapp