कोव्हिड संसर्ग झाला आहे पण लक्षणं दिसत नाहीत? सरकारने दिल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना

मुंबई तक

• 02:48 PM • 06 Jan 2022

कोरोनाने देशात आणि राज्यात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या लक्षणं नसणाऱ्या आणि सौम्य लक्षणं असणाऱ्या रूग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आयसोलेशनचा कालावधी हा १४ दिवसांचा होता जो आता सात दिवसांवर आणण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली या ठिकाणी होम आयोसेलेशन संदर्भातल्या गाईडलाईन्स देण्यात […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाने देशात आणि राज्यात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या लक्षणं नसणाऱ्या आणि सौम्य लक्षणं असणाऱ्या रूग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आयसोलेशनचा कालावधी हा १४ दिवसांचा होता जो आता सात दिवसांवर आणण्यात आला आहे.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली या ठिकाणी होम आयोसेलेशन संदर्भातल्या गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लक्षणं नसणाऱ्या पण कोव्हिड पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांनी सात दिवस आयोसेलेशनमधे रहावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सात दिवस आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर जर ताप आला नाही तर कोव्हिड टेस्टही करू नये असंही सरकारने गाईडलाईन्समध्ये म्हटलं आहे.

Corona : इटलीहून भारतात आलेल्या विमानात कोरोना विस्फोट!…. 170 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

लक्षणं नसलेले रूग्ण म्हणजे नेमकं काय?

नव्या गाईडलाईन्स नुसार लक्षणं नसलेले रूग्ण म्हणजे असे रूग्ण ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र त्यांना ताप किंवा खोकला अशी लक्षणं नाहीत. तसंच त्यांची ऑक्सिजन लेव्हल 93 पेक्षा कमी झालेली नाही असे सगळे लोक लक्षणविरहित रूग्णांमध्ये येतात. सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणं म्हणजे ज्यांना सर्दी, खोकला, घशात खवखव आणि ताप अशी लक्षणं आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार सात दिवसांचा आयसोलेशन कालावधी अशांसाठी पुरेसा आहे. या सात दिवसातल्या शेवटच्या तीन दिवसात ताप आला नाही तर हा कालावधी संपेल जर ताप आला तर आयसोलेशनचा कालावधी वाढवला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दुबईहून आलेल्या मुंबईकरांना सात दिवस होम क्वारंटाईन सक्तीचं! वाचा सविस्तर काय आहेत गाईडलाईन्स?

होम आयसोलेटेड असताना काय काळजी घ्याल? काय टाळाल?

यावेळी कोरोना संसर्ग झाल्यानंतर तातडीने रूग्णालयात दाखल करावं लागणाऱ्या रूग्णांची संख्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी आहे. बहुतांश लोकांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जातो आहे.

होम क्वारंटाईन असलेल्या लोकांनी स्वतःला बंदिस्त खोलीत बंद करून घेऊ नये. त्यांची खोली हवेशीर असावी.

सकाळी आणि संध्याकाळी खिडकी उघडून व्यवस्थित सूर्यप्रकाश त्यांनी खोलीत येऊ द्यावा.

खोलीत हवा खेळती असावी. ज्या रूग्णांना सहव्याधी आहेत अशांपासून मात्र कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्यांनी लांबच रहावं.

खोलीमध्ये असताना मास्क आवर्जून वापरावा, दर आठ तासांनी मास्क बदलावा.

समजा या आठ तासांमध्ये खोकल्यामुळे किंवा शिंकल्याने मास्क ओला झाला तर तो त्वरित बदलावा

हात साबणाने, हँड वॉशने स्वच्छ करावे. हँड सॅनेटायझरचा वापरही करावा.

काय टाळाल?

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कोणतीही औषधं घेऊ नयेत.

पेन किलर गोळ्या चुकूनही घेऊ नयेत.

दही किंवा आंबट पदार्थ किंवा कोणतेही थंड पदार्थ खाऊ नयेत.

एकटे असणारे लोक बऱ्याचदा फोनवर बोलतात, मात्र ते पण टाळावं तुमच्या घशाला आराम देण्याची गरज या काळात असते हे विसरू नये.

    follow whatsapp