Taj Mahal : ताजमहालामधल्या २२ बंद खोल्या उघडा, भाजप प्रवक्त्याची याचिका

मुंबई तक

• 11:08 AM • 08 May 2022

ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका. भाजपच्या प्रवक्त्याने ही याचिका केली आहे. काय म्हटलं आहे भाजपच्या प्रवक्त्याने? ताजमहाल या सुप्रसिद्ध वास्तूमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी या प्रवक्त्याने केली आहे. […]

Mumbaitak
follow google news

ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका. भाजपच्या प्रवक्त्याने ही याचिका केली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे भाजपच्या प्रवक्त्याने?

ताजमहाल या सुप्रसिद्ध वास्तूमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी या प्रवक्त्याने केली आहे. यासाठी या प्रवक्त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात धाव घेतली आहे. तसंच या प्रकरणी एसआयतर्फे चौकशी करण्यात यावी असाही उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

ताजमहालात हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा या भाजपच्या प्रवक्त्याने आपल्या याचिकेत केला आहे. ASI आणि सांस्कृतिक मंत्रालय या दोहोंकडे मी ताजमहालातल्या २२ खोल्या बंद का आहेत? अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी मला सुरक्षेच्या कारणास्तव त्या बंद आहेत असं उत्तर दिल्याचंही या याचिकेत या प्रवक्त्याने नमूद केलं आहे.

जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल हे एक आहे. ताजमहालाची भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरात ओळख आहे. संपूर्ण संगमरवरात घडवलेली ही वास्तू पाहण्यासाठी लोक जगभरातून येत असतात. ताजमहाल ही वास्तू प्रेमाचं प्रतीक म्हणूनही ओळखली जाते. ताजमहाल ही वास्तू मुघल बादशाह शाहजहान याने आपली पत्नी मुमताज महलची आठवण म्हणून बनवली. ताजमहाल उत्तम मानवी कलाकृतीपैकी एक आहे.

ताजमहल पांढऱ्या संगमरवरपासून बनवण्यात आला आहे. ताजमहाल हे भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा ह्या शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताजमहाल म्हणजे सफेद रंगाची उत्कृष्ट आणि कलाकृती असलेली इमारत आहे. ही इमारत मोगल बादशाह शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ (1632ते 1653 दरम्यान) बांधली होती. मुमताज ही शहाजहानला त्याच्या इतर पत्नींपेक्षा प्रिय होती. आपल्या 14 व्या पुत्राला जन्म देताना तिने देहत्यागला आणि तिच्या आठवणीत ताजमहाल उभे राहिले. या इमारतीच्या बांधकामाला पूर्ण होण्यास एकूण 21 वर्षांचा कालावधी लागला. ताज महाल चे काम करण्यासाठी एकूण 20 हजार कामगार खर्ची पडले होते असंही इतिहासात सांगितलं जातं.

    follow whatsapp