Monsoon Session : अधिवेशनाची वादळी सुरुवात, पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उठताच विरोधकांचा गदारोळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात वादळी पद्धतीने झालेली पहायला मिळाली. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर नवीन खासदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या नवीन मंत्रीमंडळाची ओळख करुन देण्यासाठी उठत असतानाच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदारांनी गदारोळ करायला सुरुवात केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करुन विरोधी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:30 AM • 19 Jul 2021

follow google news

संसदेच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात वादळी पद्धतीने झालेली पहायला मिळाली. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर नवीन खासदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या नवीन मंत्रीमंडळाची ओळख करुन देण्यासाठी उठत असतानाच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदारांनी गदारोळ करायला सुरुवात केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करुन विरोधी खासदार शांत झाले नाहीत, ज्यानंतर कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. विरोधकांच्या या गदारोळावर मोदींनी आपल्या शैलीत टोला लगावला.

पंतप्रधान म्हणाले की, मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु विरोधी पक्ष दलित, महिला आणि ओबीसी लोक मंत्री बनवण्याच्या चर्चा पचवित नाहीत. मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मंत्रीमंडळाची ओळख करून देत असताना ही टीका केली. हा गोंधळ पाहून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोनादरम्यान मृत्यू पावलेल्या खासदारांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच विरोधकांच्या गदारोळानंतर बिर्ला यांनी हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला.

    follow whatsapp