Crime News : एका तरुणानं त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या तरुणीचा फेसबुक आयडी हॅक करून तिचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने विद्यार्थिनीच्या फोटोंमध्ये फेरफार करून तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्याकडून तब्बल 3 लाख रुपये रोख व 50 लाख रुपयांचे दागिने उकळले. या प्रकारामुळे पीडित मुलगी इतकी घाबरली होती की तिची प्रकृती खालावली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. उत्तर प्रदेशातील आग्रा परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Personal Finance: क्रेडिट कार्ड हरवल्यावर झटपट करा ही 7 कामं, नाहीतर होईल प्रचंड नुकसान
खाण्यातून गुंगीचे औषध आणि शारीरिक शोषण
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता 12 वीत शिकत असल्यापासून हा प्रकार सुरु आहे. कृष गुप्ता नावाच्या तरुणाने सॉफ्टवेअरच्या मदतीने मुलीचे फोटो मॉर्फ करून तिला धमकावण्यास सुरुवात केली. एप्रिल 2025 पासून पीडितेची प्रकृती खालावू लागली होती, तपासात असे समोर आले की आरोपीने तिला अन्नातून काहीतरी गुंगीचे औषधही दिले होते. यानंतर तिचे शारीरिक शोषण केले. बदनामीच्या भीतीने पीडितेच्या कुटुंबाला सध्या आग्र्याबाहेर स्थलांतर करावे लागले आहे.
पाच लाख रुपयांची खंडणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जेव्हा पीडितेच्या वडिलांनी विचारणा केली, तेव्हा आरोपी कृष आणि त्याच्या वडिलांनी चक्क पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नाही तर आरोपीने पोलीस चौकीत मुलीवरच खोटे आरोप करत तिने आपली दुचाकी चोरल्याचा बनाव रचला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी दागिने परत करण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली, मात्र प्रत्यक्षात आरोपींनी पीडितेच्या सोशल मीडियावरून अश्लील पोस्ट करणे सुरूच ठेवले.
हे ही वाचा : KDMC मध्ये प्रचंड पोलीस फौजफाटा कशासाठी? प्रशासनाला 'या' गोष्टीची प्रचंड भीती
मुख्य आरोपी आणि वडील ताब्यात
या संपूर्ण प्रकरणात आग्रा पोलिसांनी आता ठोस पावले उचलली असून मुख्य आरोपी कृष गुप्ता, त्याचे वडील नीरज गुप्ता आणि अन्य नातेवाईकांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलच्या मदतीने पुराव्यांची जुळवाजुळव केली जात असून, हॅक झालेली फेसबुक आयडी आणि बदनामीसाठी वापरण्यात आलेले डिजिटल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT











