देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांवर आता इंधन दरवाढीचाही बोझा पडू लागला आहे. शनिवारी इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं राज्यातील सर्वच शहरातील इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले. (petrol diesel price hiked today 23 october)
ADVERTISEMENT
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज विक्रमी झेप घेत असून, आज सलग चौथ्या दिवशी तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे 35 पैशांनी वाढले असून, त्यामुळे देशातीप प्रमुख शहरांसह राज्यातील सर्वच शहरातील इंधन दरात मोठी वाढ झाली आहे.
तेल वितरक कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीप्रमाणे दिल्लीत पेट्रोलचे दर विक्रमी पातळीवर म्हणजे प्रतिलिटर 107.24 रुपयांवर पोहोचले आहेत. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 113.12 पैसे मोजावे लागत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेलच्या किंमतीही पेट्रोल दराचे बोट धरून प्रचंड वाढल्या आहेत. मुंबईत डिझेलचे दर 104 रुपये प्रतिलिटरवर गेले आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)
शहर पेट्रोल डिझेल
अहमदनगर : 113.25 102.53
अकोला : 113.02 102.34
अमरावती : 113.61 102.90
औरंगाबाद : 113.54 102.81
भंडारा : 113.72 103.01
बीड : 113.97 103.23
बुलढाणा : 113.73 103.02
चंद्रपूर : 113.14 102.47
धुळे : 113.47 102.75
गढचिरोली : 114.07 103.36
गोंदिया : 114.04 103.32
मुंबई उपनगर : 113.18 104.06
हिंगोली : 114.11 103.39
जळगाव : 113.73 103.02
जालना : 115.11 104.31
कोल्हापूर : 113.56 102.85
लातूर : 114.05 103.31
मुंबई : 113.12 104.00
नागपूर : 113.10 102.42
नांदेड : 116.99 106.13
नंदुरबार : 113.78 103.05
नाशिक : 112.72 102.01
उस्मानाबाद : 113.61 102.89
पालघर : 112.71 101.98
परभणी : 115.73 104.91
पुणे : 113.27 102.55
रायगढ : 112.62 101.90
रत्नागिरी : 115.28 104.51
सांगली : 113.00 102.31
सातारा : 113.54 102.81
सिंधुदुर्ग : 114.64 103.89
सोलापूर : 113.37 102.66
ठाणे : 113.30 104.18
वर्धा : 113.51 102.81
वाशिम : 113.85 103.14
यवतमाळ : 114.32 103.59
ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळी
पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यापासून देशात इंधनाचे दर वाढत आहेत. मात्र, ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या 18 व 19 ऑक्टोबर रोजी इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून ही वाढ कायम आहे. आतापर्यंत सर्वच शहरातील पेट्रोलचे दर शंभरीच्या पुढे गेलेले होते. मात्र, आता डिझेलचे दरही शंभरीच्या पुढे गेले आहेत.
ADVERTISEMENT
