पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गंगास्नान! गंगाजल घेऊन जाणार काशी विश्वनाथ मंदिरात

मुंबई तक

• 07:34 AM • 13 Dec 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमधे जाऊन गंगा स्नान केलं. त्यानंतर ते गंगाजल घेऊन काशीला जाणार आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचं लोकार्पण या निमित्ताने झाली आहे. काशीच्या विश्वेश्वर मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचं नवं रूप समोर येणार आहे. या कार्यक्रमात भाजप […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमधे जाऊन गंगा स्नान केलं. त्यानंतर ते गंगाजल घेऊन काशीला जाणार आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचं लोकार्पण या निमित्ताने झाली आहे. काशीच्या विश्वेश्वर मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचं नवं रूप समोर येणार आहे. या कार्यक्रमात भाजप शासित 12 राज्यांचे मुख्यमंत्री आणि 9 उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीत आले आहे. सगळ्यात आधी त्यांनी कोतवाल कालभैरवाची आरती केली आहे.

हे वाचलं का?

गंगा नदीमध्ये अलकनंदा क्रूझवर स्वार होऊन पीएम मोदी ललिता घाट या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. गंगा घाटावर येत असताना अलकनंदा क्रूझवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हात दाखवून अभिवादन केलं. आज काशीमध्ये बम बम भोले, हर हर महादेवच्या घोषणा ऐकू येत आहेत. या घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत तीस तास असणार आङेत. सोमवारी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचं लोकर्पण करतील. त्यानंतर ते शिव दिपावलीचा कार्यक्रम पाहतील. त्यानंतर मंगळवारी ते भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनाला संबोधित करतील.

अहिल्याबाई होळकर ते मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट;
काय आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉर?

काशी विश्वनाथ धाम हे आता नव्या रुपात दिसणार आहे. त्याचे फोटोही आता समोर आले आहेेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं आज (13 डिसेंबर) मोदींच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या काशी विश्वनाथांच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीनंतर तब्बल अडीचशे वर्षांनंतर हे बांधकाम होत आहे. राणी अहिल्याबाईंच्या योगदानाचे स्मरण करून श्री काशी विश्वनाथ धामच्या प्रांगणात त्यांचा पुतळा देखील बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच तिथल्या भिंतीवरही त्यांच्या योगदानाची नोंदही करण्यात येणार आहे.

इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात विविध ठिकाणी अनेक मंदिरे, घाट बांधले, पण काशीच्या इतिहासात त्यांचे स्थान अमिट आहे. श्री विश्वनाथ धामचा इतिहास अहिल्यादेवी यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच अहिल्याबाईंचा पुतळा विश्वनाथ धाममध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतिहासात अशी नोंद आहे की, मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून 1669 मध्ये काशीचं हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्यामध्ये मंदिराचे पूर्ण नुकसान झाले होते. पण त्यानंतर विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीचे श्रेय होळकर घराण्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडेच जाते.

    follow whatsapp