Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस (Delhi Police) रविवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी आणि डीसीपी सध्या राहुल गांधी यांच्या घरात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. तासाभरानंतरही राहुल पोलिसांना भेटले नाही, अशी देखील माहिती मिळतेय. (Police reach Rahul Gandhi’s house in Delhi; )
ADVERTISEMENT
त्याचवेळी राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पवन खेडा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र पोलिसांनी आधी त्यांना आत जाण्यापासून रोखले. मात्र, नंतर परवानगी देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. पवन खेडा म्हणाले की, राहुल गांधींना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला काय वाटलं ते घाबरतील?, असं खेडा म्हणाले.
राहुल गांधी वीर सावरकरांबाबत योग्यच बोलले, तुषार गांधींचा पाठिंबा
खरे तर श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी आजही महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना 16 मार्च रोजी नोटीस पाठवून विचारणा केली होती की, हे बोलणाऱ्या महिला कोणत्या आहेत. राहुल गांधींनी त्याची माहिती दिल्ली पोलिसांना द्यावी. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्याने अद्याप दिल्ली पोलिसांना उत्तर दिलेले नाही.
विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था) सागरप्रीत हुड्डा यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये विधान केले की यात्रेदरम्यान ते अनेक महिलांना भेटले आणि त्यांनी राहुल गांधींना सांगितलं की, त्यांचं लैंगिक शोषण झालंय. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल.
भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्राला निरोप : सीमेवरील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी भावूक
काँग्रेसने केंद्रावर निशाणा साधला
त्याचवेळी राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी नोटीस दिल्याबद्दल काँग्रेसने केंद्रावर निशाणा साधला. काँग्रेसने म्हटले होते की, पंतप्रधान मोदी आणि अदाणी यांच्यातील संबंधांवर राहुल गांधींच्या प्रश्नांमुळे अस्वस्थ झालेले सरकार पोलिसांच्या मागे लपून कारवाई करत आहेत. कायद्यानुसार योग्य वेळी नोटीसला उत्तर देऊ, असे काँग्रेसने म्हटले होते. ही नोटीस सरकार घाबरल्याचा आणखी एक पुरावा आहे, असा दावा करण्यात आला.
काय प्रकरण आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी वक्तव्य केले होते की, आताही महिलांचे लैंगिक शोषण होत आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी काही प्रश्नांची यादी राहुल गांधींना पाठवली होती. तसेच या महिलांची माहिती देण्यास सांगितले, जेणेकरून त्यांना सुरक्षा प्रदान करता येईल, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
Rahul Gandhi : नोटीस आली, खासदारकीवर टांगती तलवार; राहुल गांधी म्हणाले…
ADVERTISEMENT
