खोल समुद्रात आढळणाऱ्या अवाढव्य व्हेल माशाची उलटीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. सुगंधी द्रव्य आणि इतर रसायन तयार करण्यासाठी या उलटीचा वापर केला जातो. ही उलटी बाळगण्यास आणि विक्री करण्यास शासनाने बंदी घातलेली असतानाही, ही उलटी बाळगणाऱ्या तिघांना रायगडच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
ADVERTISEMENT
१० जानेवारी रोजी मुरूड तालुक्यातील काशिद गावचे नाक्यावर तीन जण त्यांचे कडील दोन मोटार सायकलवरून, शासनाने बंदी घातलेल्या व्हेल माशाची उल्टी घेऊन खरेदी व विक्रीकरीता घेवून येणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला होता.
यावेळी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर अलिबाग – मुरुड रोडवरील सदगुरु कृपा गेस्ट हाऊसवर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी दर्पण रमेश गुंड, नंदकुमार थोरवे, राजेंद्र ठाकूर या तिघांना अटक केली. या तिघांकडून व्हेल माशाची ५ किलो उलटी आणि दोन मोटारसायकल असा एकूण ५ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
