‘नितीन गडकरी जेव्हा बोलतात तेव्हा वाटतं…’; ‘फाऊंटेन शो’ बघून राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

• 05:55 PM • 18 Sep 2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी नागपूरात फुटाळा तलाव येथे फाऊंटेन शो चा आनंद लुटला. त्यानंतर राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतूक केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरातील फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचं म्युझिकल फाऊंटेन उभारण्यात आलंय. या फाऊंटेनमध्ये नागपूर शहराचा […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी नागपूरात फुटाळा तलाव येथे फाऊंटेन शो चा आनंद लुटला. त्यानंतर राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतूक केलं.

हे वाचलं का?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरातील फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचं म्युझिकल फाऊंटेन उभारण्यात आलंय. या फाऊंटेनमध्ये नागपूर शहराचा आजपर्यंतचा इतिहास साकारलेला आहे.

म्युझिकल फाऊंटेन शो बघितल्यावर राज ठाकरे काय म्हणाले?

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे मित्र आहेत. आज जो फाऊंटेन शो पहिला, ते मी आजपर्यंत भारतात पाहिलेला नाहीये. जे काही पाहिलं ते भारताबाहेरच पाहिलं. त्यामुळे नितीनजी जे काही करतात ते भव्य दिव्य असत’, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली.

‘गडकरी जे करतात, ते वरच जातं’; नितीन गडकरींचं कौतुक करताना राज ठाकरे काय म्हणाले?

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे काय करतात, ते वरच जातं. कारण फाउंटेन वर, फ्लाय ओव्हर हे सुद्धा वर जातात. आमच्या दोघांचं मन जुळण्यामागं एक कारण म्हणजे दोघांचे विचार हे भव्य-दिव्य असतात.’

‘नितीनजी, जेव्हा बोलतात तेव्हा असं वाटतं की हे कसं होणार? ते झाल्यावर असं वाटतं हे होऊ शकतं. त्यामुळे यानंतर नागपूरला येण्यासाठी आणखी एक कारण मिळालं आहे. त्यामुळे संत्रा नगरीतच नाही, तर कारंजा नगरीतही स्वागत म्हणून मला येता येईल’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘हे अशा पद्धतीचे कारंजे कुठेच पाहिले नाहीये. आज जे पाहिलं ते अद्भुत चित्र होतं. नागपूरकरच नाही, तर देशातील लोक हे बघण्यासाठी येतील. त्यामुळे त्या दृष्टीने त्यासाठी जी बांधणी लागेल, ती बांधणी नागपुरात होणं गरजेचं आहे’, अशा शब्दात राज ठाकरेंनी म्युझिकल फाऊंटन संकल्पनेचं कौतुक केलं.

राज ठाकरे ‘कलाकार’, ते आले याचा आनंद -नितीन गडकरी

यावेळी नितीन गडकरींनी राज ठाकरे यांचे आभार मानले. ‘राज ठाकरे हे कलाकार आहेत. कलाकार म्हणजे राजकारणातील नव्हे, तर राज ठाकरे चित्रकलेपासून साहित्यापर्यंत, तसेच कार्टूनपासून तर संगीतापर्यंत या सगळ्या क्षेत्रातले ते तज्ञ असे कलाकार आहेत.’

‘स्वर्गीय लता मंगेशकर यांचं नाव या फाउंटेनला देणार असून, राज ठाकरे यांच्याशी लतादीदीचं पुत्रवत नातं होत. प्रेम होतं. त्यामुळे राज ठाकरे यांना हा फाउंटेन शो पाहण्यासाठी आमंत्रण दिलं. ते आलेत, याचा आनंद आहे’, अशा भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

    follow whatsapp