प्रवीण आणि संजय राऊतांची अटक बेकायदेशीर! कोर्टानं ईडीला कडक शब्दात झापलं

मुंबई : खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदेशीर होती. ईडीने त्यांच्या मर्जीने आरोपी निवडले, असं मत नोंदवत पीएमएलए न्यायालयाने ईडीला अत्यंत कडक शब्दात झापलं आहे. तसंच न्यायालयाने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचा आज जामीन नाकारला तर सर्वसामान्य माणसांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशीही भूमिका न्यायालयाने घेतली. संजय राऊत यांच्या जामीन आदेशाचे […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 12:34 PM • 09 Nov 2022

follow google news

मुंबई : खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदेशीर होती. ईडीने त्यांच्या मर्जीने आरोपी निवडले, असं मत नोंदवत पीएमएलए न्यायालयाने ईडीला अत्यंत कडक शब्दात झापलं आहे. तसंच न्यायालयाने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचा आज जामीन नाकारला तर सर्वसामान्य माणसांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशीही भूमिका न्यायालयाने घेतली.

हे वाचलं का?

संजय राऊत यांच्या जामीन आदेशाचे न्यायालयाने तब्बल 122 पानी आदेश काढले. यात अत्यंत कडक शब्दात ही सर्व निरीक्षण नोंदवली. न्यायालयाने प्रवीण आणि संजय राऊत यांना जामीन देताना ईडीच्या तपासावर उपस्थित केलेले हे प्रश्नचिन्ह आणि हा आदेश म्हणजे त्यांना पुढील काळात क्लीन चिट मिळण्यासाठी मदत होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

न्यायालयानं नेमकं काय म्हटलं?

  • सिव्हिल प्रकरणांना ‘मनी लॉड्ररिंग’चे नाव दिल्याने तसा गुन्हा दाखल होत नाही. यामुळे निष्पाप लोकांना त्रास होतो.

  • प्रवीण राऊत यांची अटक ही निव्वळ सिव्हिल प्रकरणात होती, संजय राऊतांचा त्यांच्याशी संबंध नव्हता.

  • या प्रकरणात म्हाडाची भूमिका संशायस्पद आहे आणि ईडीने देखील काही ठिकाणी मान्य केलं आहे. मात्र म्हाडामधील कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

  • ईडीने रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेटनुसार राकेश आणि सारंग वाधवान यांची या प्रकरणात मुख्य भूमिका आहे, हे मुख्य आरोपी आहेत. मात्र त्यांना अटक करण्यात आलेली नाही. याचं कारण काय?

  • न्यायालयाने ईडी आणि म्हाडाचं म्हणणं आज मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल.

  • संजय राऊत प्रवीण राऊत यांचा संबंध नसताना देखील त्यांना अटक करण्यात आली आहे.

  • जर न्यायालयाने प्रवीण आणि संजय राऊतांचा जामीन नाकारला तर सर्वसामान्य माणसांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल.

    follow whatsapp