Sanjay Raut: ”मी त्यांना चोरमंडळ म्हटलं…”, राऊतांच स्पष्टीकरण

मुंबई तक

03 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:09 PM)

sanjay Raut face privilege after controversial statement : कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंगाची (Privilege Motion) कारवाई करण्याची मागणी भाजप-शिवसेनेने केली होती. यासाठी समीतीही गठित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. त्यात आता संजय राऊत यांनी ‘चोरमंडळ’ विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना संजय […]

Mumbaitak
follow google news

sanjay Raut face privilege after controversial statement : कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंगाची (Privilege Motion) कारवाई करण्याची मागणी भाजप-शिवसेनेने केली होती. यासाठी समीतीही गठित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. त्यात आता संजय राऊत यांनी ‘चोरमंडळ’ विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी हक्कभंगाची नोटीस आणि चोरमंडळ विधानावर पुन्हा भाष्य केलं आहे. नेमकं ते काय म्हणालेत, हे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

कसब्यात BJPचा ‘करेक्ट कार्यक्रम’ नेमका केला तरी कोणी?, वाचा इंटरेस्टिंग माहिती

काय म्हणाले संजय राऊत ?

‘चोरमंडळ’ विधानावरून राजकारण तापले असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटलं ना, त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. मीही तेच म्हणालो, विधीमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल, असे काही विधान मी केलेल नाही, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

…म्हणून चोरमंडळ म्हटलं

पक्ष चोरी करणे, धनुष्यबाण चिन्ह चोरणे आणि पुन्हा आम्हीच शिवसेना असल्याचे बेकायदेशीरपणे सांगण, त्यामुळे एक विशिष्ट गट बेकायदेशीपणे शिवसेना आमची असल्याचे सांगतोय, त्यांना मी ‘चोरमंडळ’ म्हटलंय,असे राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या लोकांना अख्खा महाराष्ट्र आणि संपुर्ण देश चोर म्हणतोय. हे फक्त एकाच पक्षा पुरत नाहीये, कोणत्याही पक्षात अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांना चोर आणि दरोडेखोरच म्हटले जाते. बच्चू कडू यांना अडवून लोकांनी तेच दाखवून दिले आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे.

Mumbai: मोठी बातमी… मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

हक्कभंगाच्या नोटीसीवर काय म्हणाले?

नोटीस आली असेल, पण मी अजून पाहिली नाही. माझ्या हातात नोटीस पडली नाही.नोटीस जेव्हा मी घरी, कार्यालयात जाईन तेव्हा पाहिन. तसेच माझ्या हातात जर नोटीस आली असती तर ती मी उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईने कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही. तसेच मी माझी बाजू समर्थपणे मांडेन,असे देखील राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

तुरूंगात टाकलं, आता फासावर लटकवा

मला फासावर लटकवणार आहात का, तर लटकवा..काय हरकत नाही…तेवढच शिल्लक आहे. आता तुरूंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असे देखील संजय राऊत म्हणालेत. तसेच ते विधान मी बाहेर केलं आहे, त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावे लागणार, असे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आता संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची (Privilege Motion) कारवाई होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp