दुर्गाडी उत्सवात ठाकरे गटाला धक्का : दसरा मेळाव्यानंतर आणखी एक वाद न्यायालयात?

ठाणे : शिवसेनेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन्ही गट दसरा मेळाव्यावरुन आमने-सामने आले आहेत. एकीकडे हा वाद कायम असतानाच दुसऱ्या बाजूला ठाण्यातील किल्ले दुर्गाडीवरील नवरात्रोत्सवाचे यजमानपद शिंदे गटाला मिळाले आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शिंदे गटाचे आमदार विश्वानाथ भोईर यांच्याकडे या नवरात्रौत्सवाचे यजमानपद दिले आहे. आमदार भोईर यांनी नवरात्रोत्सवासाठी 9 […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:41 AM • 23 Sep 2022

follow google news

ठाणे : शिवसेनेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन्ही गट दसरा मेळाव्यावरुन आमने-सामने आले आहेत. एकीकडे हा वाद कायम असतानाच दुसऱ्या बाजूला ठाण्यातील किल्ले दुर्गाडीवरील नवरात्रोत्सवाचे यजमानपद शिंदे गटाला मिळाले आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शिंदे गटाचे आमदार विश्वानाथ भोईर यांच्याकडे या नवरात्रौत्सवाचे यजमानपद दिले आहे.

हे वाचलं का?

आमदार भोईर यांनी नवरात्रोत्सवासाठी 9 फेब्रुवारी रोजी मागितलेल्या परवानगी पत्रानुसार त्यांना रितसर परवानगी दिल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या परवानगीसाठी आपण आधी अर्ज केला असतानाही परवानगी शिंदे गटाला देण्यात आल्याने ही मनमानी असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सचिन बासरे यांनी केला आहे.

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणारा नवारात्रोत्सव हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नवरात्रोत्सवांपैकी एक आणि अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. मागील 54 वर्षांपासून हा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. दुर्गाडी नवरात्रोत्सवाच्या यजमानपदाचा निर्णयाचे अधिकार ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

कायदेशीर लढाई लढण्याचा ठाकरे गटाचा इशारा :

शिवसेनेतील फुटीनंतर शहरप्रमुख बनलेल्या बासरेंनी मागील महिन्यात उत्सवासाठी आपल्याला परवानगी मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. उत्सवाला अवघे चार दिवस बाकी असताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी भोईर यांना परवानगी दिली आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे इशारा बासरेंनी दिला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला परवानगी दिली असून आता दिवस कमी उरलेत. लवकरात लवकर तयारी पूर्ण करत यंदा नवरात्रीचा उत्सव जल्लोषात करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.

    follow whatsapp