शिंदे गटाला धक्का : शिरुरमधून भाजप ताकद आजमावणार; आढळराव पाटलांचा पत्ता कट होणार?

शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिरुरमधून खासदार काम करणारा असावा, आणि तो भाजपचा असावा असं म्हणतं भाजपच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेणुका सिंग सध्या भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना’ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:34 AM • 15 Sep 2022

follow google news

शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिरुरमधून खासदार काम करणारा असावा, आणि तो भाजपचा असावा असं म्हणतं भाजपच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेणुका सिंग सध्या भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना’ अंतर्गत 3 दिवसीय शिरुर लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्या बुधवारी मंचर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हे वाचलं का?

रेणुका सिंग म्हणाल्या, शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपची ताकत वाढावी यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर जबादारी दिली आहे. त्यासाठी 3 दिवस या मतदारसंघात फिरत आहे. स्थानिक माजी खासदार कोणत्या गटाचा किंवा कोणत्या पक्षाचा याबाबत आपल्याला काही म्हणालयचं नाही. ते आमच्या सोबत युतीत होते, पण तरीही आता दिवस बदलले आहेत. आम्ही आमची ताकद अजमावणार आहोत. राष्ट्रवादीची कथणी आणि करणी वेगळी आहे. त्यामुळे यापुढचा खासदार काम करणारा असावा आणि भाजपचा असावा, असेही सिंग महणाल्या.

Anil Agarwal : अवघ्या विसाव्या वर्षी बिहारमधून मुंबईत येत वेदांताचं साम्राज्य उभं केलं

शिरुरमधून भाजपचा उमेदवार निवडून येईल :

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. त्या रेणुका सिंग यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना बोलत होत्या. त्यामुळे भाजपने 2024 च्या दृष्टीने तयारी सुरु केली असून भाजपने या मतदारसंघात विस्तार करण्यास आणि ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट होणार का असा सवाल विचारला जात आहे.

शेअर बाजार ते पोलिस अकादमी : राष्ट्रवादीने दिली गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी

भाजप-शिवसेना युतीत 2009 पासून शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. सलग 2 वेळा आढळराव पाटील यांनी इथून विजय मिळविला. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाटील यांचा पराभव केला. या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन केल्याने आढळराव पाटील यांची 2024 च्या दृष्टीने चांगलीच अडचण झाली होती. त्यातच त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुणे लोकसभा लढवण्याची ऑफर दिली, त्यामुळे अखेरीस त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याचे बोलले गेले.

    follow whatsapp