Vidhan Sabha Live : फडणवीस आणि त्यांची टोळी वैफल्यग्रस्ततेचं दर्शन घडवत आहे – शिवसेना आमदाराची टीका

विधानसभेत तालिका अध्यक्षांसमोर केलेल्या राड्यावरुन महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन केलंय. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा भाजप आमदारांच्या निलंबनाने गाजला. शिवसेनेच्या भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांनीही या राडेबाजीनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात, अनेकदा भावना अनावर होऊन काही अनुचित प्रसंगही […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:38 AM • 06 Jul 2021

follow google news

विधानसभेत तालिका अध्यक्षांसमोर केलेल्या राड्यावरुन महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन केलंय. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस हा भाजप आमदारांच्या निलंबनाने गाजला. शिवसेनेच्या भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांनीही या राडेबाजीनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हे वाचलं का?

जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात, अनेकदा भावना अनावर होऊन काही अनुचित प्रसंगही घडतात जे स्वाभाविक आहे. लोकप्रतिनीधी म्हणून मर्यादांचं भान ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. भाजप आमदार एका टोळीच्या मानसिकतेत होते. पीठासीन अधिकाऱ्याच्या दालनात त्यांधी गोंधळ घातला. आई-बहिणीच्या शिव्या, झोंबाझोंबी हे नाक्यावर सुद्धा न घडणारे प्रकार अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आले. फडणवीस आणि त्यांची टोळी वैफल्यग्रस्ततेचे दर्शन घडवत असल्याची टीका आमदार यामिनी जाधव यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती विधानसभेत दिली.

    follow whatsapp