हवामान बदलामुळे जागतिकस्तरावर होत आहेत हे परिणाम; अहवालात झाले स्पष्ट

मुंबई तक

• 01:48 PM • 09 Aug 2022

जगावर कोव्हीड-19 चा प्रभाव आहेच आणि अनेक देश मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाशी लढा देत आहे. अशात एका अहवालात हवामान बदल आणि संसर्गजन्य रोग या संबंधातील भयानक वास्तव समोर आलं आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की, 58 टक्के ज्ञात मानवी संसर्गजन्य रोग एक किंवा दुसऱ्या तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होत आहेत. युरोपातील काही भाग विक्रमी उष्णतेच्या लाटेत त्रस्त […]

Mumbaitak
follow google news

जगावर कोव्हीड-19 चा प्रभाव आहेच आणि अनेक देश मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाशी लढा देत आहे. अशात एका अहवालात हवामान बदल आणि संसर्गजन्य रोग या संबंधातील भयानक वास्तव समोर आलं आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की, 58 टक्के ज्ञात मानवी संसर्गजन्य रोग एक किंवा दुसऱ्या तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होत आहेत.

हे वाचलं का?

युरोपातील काही भाग विक्रमी उष्णतेच्या लाटेत त्रस्त आहे. पावसाने कहर केल्याने इतर देशांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर यूएस जंगली आगीचा सामना करत आहे. ज्यामुळे शेकडो एकर जमीन जळून खाक झाली आहे आणि लाखो लोकांना स्थलांतरित करण्यास भाग पाडले आहे. हवामानातील बदल हा या सगळ्या घटनांना कारणीभूत आहे, असं बोललं जातं.

अभ्यासात 1,006 मार्ग आढळले

नेचर क्लायमेट चेंज या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात 1,006 मार्ग आढळले आहेत, ज्यामध्ये हवामानातील धोके, विविध संक्रमण रोगांना कारणीभूत ठरतात, असं सांगण्यात आलंय. हा अभ्यास दर्शवितो की हवामानाचा मानवी आरोग्यावर किती व्यापक प्रभाव आहे.

286 अनोख्या आजारांचे विश्लेषण

संसर्गजन्य रोगांव्यतिरिक्त संशोधकांनी सर्व प्रकारच्या मानवी आजारांवर देखील लक्ष दिले आहे. ज्यात गैर-संसर्गजन्य आजार जसे की दमा, ऍलर्जी आणि अगदी प्राण्यांच्या चाव्याव्दारे ते हवामानाच्या धोक्यांशी किती आजार जोडू शकतात हे पहिले गेले. टीमने 286 अनोख्या आजारांचे विश्लेषण केले आहे, त्यापैकी 223 हवामानाच्या धोक्यांमुळे बिघडलेले दिसत असल्याचं निदर्शसनास आहे.

    follow whatsapp