एसटी चालकाच्या राँगसाईड गाडी चालवण्याच्या चुकीने घेतला दोघांचा जीव

मुंबई तक

• 09:31 AM • 26 Oct 2021

लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स असो एसटी बसेस… एका ठराविक अंतरानंतर त्यांचे थांबे ठरलेले असतात. महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट ठिकाणीच या बसेस थांबतात. तिथे चालक व वाहकांना मोफत सुविधा मिळते अशाही चर्चा असतात. मात्र, या नादात एका एसटी चालकाकडून मोठी चूक घडली. यात बापलेकाला जीव गमवावा लागला. औसा-तुळजापूर रोडवरील उजनी मोड येथे रवि हॉटेलसमोर नांदेड-तालिकोट (KA28F2454) ही एसटी […]

Mumbaitak
follow google news

लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स असो एसटी बसेस… एका ठराविक अंतरानंतर त्यांचे थांबे ठरलेले असतात. महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट ठिकाणीच या बसेस थांबतात. तिथे चालक व वाहकांना मोफत सुविधा मिळते अशाही चर्चा असतात. मात्र, या नादात एका एसटी चालकाकडून मोठी चूक घडली. यात बापलेकाला जीव गमवावा लागला.

हे वाचलं का?

औसा-तुळजापूर रोडवरील उजनी मोड येथे रवि हॉटेलसमोर नांदेड-तालिकोट (KA28F2454) ही एसटी बस तालिकोट येथे जात होती. मात्र, उजनी मोड येथे बस चालकाने विशिष्ट हॉटेलवर करण्यासाठी बस अर्धा किलोमीटर अंतरावरून राँगसाईटने घेतली. याचवेळी उजनी येथून भातगळीकडे जात असलेल्या दुचाकीला (MH25Z4538) बसने जोराची धडक दिली.

या अपघातात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातगळी येथील ज्ञानेश्वर हनुमंत जगताप (वय 30) आणि हनुमंत माणिक जगताप (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर जगताप व हनुमंत जगताप हे बापलेक उजनी येथे शेतात फवारायची किटनाशक आणण्यासाठी गेलेले होते. गावी परतत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व भादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहेत.

उजनी मोड येथील बासुंदी महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे हॉटेलमध्ये बासुंदीचा व जेवण करण्यासाठी अनेक वाहणे थांबतात. कोणत्याही हॉटेलवर एसटी बस थांबल्यास मोफत जेवण, बासुंदी पार्सल व चालकास 200 रुपये भत्ता दिला जातो. त्यामुळे काही बसचालक येथे राँगसाईडचा विचार न करता इथे गाड्या घेऊन येतात.

ज्ञानेश्वर जगताप यांचे 3 वर्षपूर्वी लग्न झाले आहे. ते पुणे येथील कंपनीमध्ये काम करत होते. लॉकडाउन झाल्यामुळे ते भातगळी गावात राहत होते. सध्या वडिलांना मदत म्हणून ते शेती करत होते. ज्ञानेश्वर जगताप यांना 1 वर्षाची मुलगी आहे. त्याच्या मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp