“उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडी सरकार आणलं होतं, त्याचं फळ…”

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं त्याचं फळ त्यांना मिळालं अशी टीका केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी रत्नागिरीत केली आहे. ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही अशा लोकांना सोबत कोण घेईल? असं म्हणत संजय राऊत यांनाही त्यांनी टोला लगावला. रत्नागिरीत पत्रकारांशी […]

Mumbai Tak

मुंबई तक

12 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

follow google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

हे वाचलं का?

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं त्याचं फळ त्यांना मिळालं अशी टीका केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी रत्नागिरीत केली आहे. ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही अशा लोकांना सोबत कोण घेईल? असं म्हणत संजय राऊत यांनाही त्यांनी टोला लगावला. रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आहेत केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा?

उद्धव ठाकरे हे काही देव नाहीत, ते सांगत आहेत ते सगळं खरं नाही. भाजपला शिवसेनेने धोका दिला. त्यांनी आमच्या पाठीत सुरा खुपसला. आम्ही आधीपासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असं सांगितलं होतं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनी स्वतःच्या स्वार्थांसाठी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणलं असा घणाघात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी जनादेशाच्या विरोधात जाऊन सरकार आणलं होतं ज्या फळ त्यांना मिळालं

यावेळी मिश्रा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जनादेशाच्या विरुद्ध त्यांनी सरकार बनवलं त्याचं फळ त्यांना मिळालं. तसेच ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही, त्यांना सोबत कोण घेईल अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. दरम्यान आठ वर्षात ईडीने एक लाख करोड च्यावर संपत्ती आणि कॅश जप्त केली आहे. ईडी सोनिया आणि राहुल गांधी यांचीचौ कशी करते आहे. यंग इंडिया नवीन कंपनी बनली गेली आणि त्यामाध्यमातून काँग्रेस पक्ष या कंपनीचे कर्ज माफ करतो आहे. पाच हजार करोड रुपये थेट राहुल गांधी आणि सोनिया यांना देण्याचे काम काँग्रेसनं केलं. न्यायालयाच्या आदेशावरून ही चौकशी सुरु असल्याचं मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केलं.

या आधीच्या सरकारने रिफायनरीसाठी जमीन दिली नाही, आात आमचे सरकार महाराष्ट्रात आलं आहे, त्यामुळे आमचे सरकार रिफायनरीसाठी नक्की प्रयत्न करेलं असं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपने सुमारे अडीच वर्षे सातत्याने या सरकारवर टीका केली. कोरोना काळ संपल्यानंतर जेव्हा राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं २१ जूनला बंड झालं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या मुद्द्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

    follow whatsapp