महाराष्ट्रात Lockdown वाढणार, 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित-राजेश टोपे

मुंबई तक

• 01:55 PM • 12 May 2021

महाराष्ट्रात तूर्तास 18 ते 44 वयोगटाची लसीकरण मोहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर दिली आहे. आपल्याकडे तूर्तास लस उपलब्धता नाही. भारत सरकारने लसीकरणाचा जी मोहीम 45 आणि त्यावरील वयोगटासाठी सुरू केली आहे त्यांना दुसरा डोस देणं महत्त्वाचं आहे. आज घडीला भारतात सिरम आणि भारत […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात तूर्तास 18 ते 44 वयोगटाची लसीकरण मोहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर दिली आहे. आपल्याकडे तूर्तास लस उपलब्धता नाही. भारत सरकारने लसीकरणाचा जी मोहीम 45 आणि त्यावरील वयोगटासाठी सुरू केली आहे त्यांना दुसरा डोस देणं महत्त्वाचं आहे. आज घडीला भारतात सिरम आणि भारत बायोटेक अशा दोनच कंपन्या आहेत ज्यांच्याकडून लस मिळते आहे. आज घडीला दहा लाख डोसेस आपल्याकडे आहे. येत्या चार दिवसात 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांना दुसरा डोस देण्यात येईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

तसंच लॉकडाऊन आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्याचा कल अनेक मंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनाही आम्ही याबाबत सांगितलं आहे. त्यानुसार लवकरच निर्णय मुख्यमंत्री घेतील. 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढेल मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Oxygen, Remdesivir, Vaccines सह कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू-राजेश टोपे

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येत आहेत. 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांचा लसीकरणाची जी राष्ट्रीय मोहीम भारताने हाती घेतली आहे त्यासाठीच लसी कमी पडत आहेत. दुसरा डोस देण्यासाठी भारत सरकारकडून लसींचा पुरवठा होत नाहीये. कोव्हिशिल्डला दीड ते दोन महिना आणि कोव्हॅक्सिनला एक महिना अशी मुदत असते. या मुदतीत जर दुसरा डोस दिला नाही तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही.

Oxygen च्या बाबतीत महाराष्ट्र लवकरच स्वयंपूर्ण होणार-राजेश टोपे

महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 या वयोगटासाठी खरेदी केलेली लस ही आता 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तूर्तास आपण 18 ते 44 या वयोगटाचं लसीकरण स्थगित करतो आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. अदर पूनावला यांनीही असं सांगितलं आहे की 20 कोटी डोसेस दर महिन्याला देऊ असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे वेगाने लसीकरण करण्यावरच आमचा भर असेल तूर्तास आम्ही 18 ते 44 वयोगटाला लस देण्याची मोहीम आम्ही तूर्तास स्थगिती देत आहोत.

    follow whatsapp