पुण्यात फेसबुक लाइव्ह करून तेराव्या मजल्यावरून उडी मारत वेटरची आत्महत्या

मुंबई तक

• 09:07 AM • 20 Nov 2021

पुण्यातल्या एका हॉटेलच्या वेटरने फेसबुक लाइव्ह करत हॉटेलच्या पेंटहाऊसच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अरविंद सिंग राठोड (वय 26) असं या वेटरचं नाव आहे. तो मूळचा उत्तराखंडचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा असून महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला आला होता. मात्र महिनाभराच्या कालावधीत त्याला खूप त्रास […]

MumbaiTak
Google CTA

पुण्यातल्या एका हॉटेलच्या वेटरने फेसबुक लाइव्ह करत हॉटेलच्या पेंटहाऊसच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अरविंद सिंग राठोड (वय 26) असं या वेटरचं नाव आहे. तो मूळचा उत्तराखंडचा होता.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा असून महिन्याभरापूर्वीच मुंढवा येथील हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला आला होता. मात्र महिनाभराच्या कालावधीत त्याला खूप त्रास सहन करावा लागला.त्यातून बुधवारी रात्रीच्या सुमारास अरविंदसिंह राठोड हा हॉटेलच्या टेरेसवर 13 व्या मजल्यावर गेल्यावर फेसबुक लाइव्ह केले.

मी आत्महत्या करणार असून हॉटेलमधील काही व्यक्तीनी वाईट केले असून फसवून काही काम करुन घेतले आहे. असे म्हणत असल्याचे दिसताच, त्याला अनेकांनी फोन केले.त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.