मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांचं भवितव्य हे आज (21 मार्च) संध्याकाळी ठरणार आहे. याविषयी शरद पवार हे स्वत: संध्याकाळी काही महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समजते आहे.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. आज राज्यभरात भाजपने अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवली असून त्या बैठकीकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
ADVERTISEMENT
