पुण्यात बकरी ईदनंतर सारसबाग बंद, नेमकं कारण काय?

Pune Sarasbaug Closed Issue : पुण्यात बकरी ईदच्या दोन दिवसानंतर सारसबाग परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे. धार्मिक स्थळी आणि सामाजिक भावनांच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई तक

• 08:39 PM • 27 May 2026

follow google news

Pune Sarasbaug Closed Issue : पुण्यात बकरी ईदनंतर सारसबाग उद्यान दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचा महापालिकेचा निर्णय आहे. पुणे महापालिकेनं सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. गतवर्षी देखील बकरी ईदनंतर सारसबाग बंद ठेवण्यात आली होती. याचवरून मतमतांतर होण्याची शक्यता असून सुरक्षेच्या कारणास्तव बाग बंद ठेवण्याचं कारण सांगितलं, यामागे धार्मिक कारण देखील असण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, सारसबागमधील सिद्धिविनायक मंदिर परिसरात वाद होऊ नये याचपार्श्वभूमीवर महापालिकेनं हा निर्णय घेतला. बकरी ईदच्या वेळेस मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित राहतो, ज्यामुळे काही वेळा सामाजिक आणि धार्मिक भावनांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अशातच प्रशासनाच्या आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयाने सुरक्षिततेचा विचार केला जात आहे. 

राज्यातील काही राजकीय व स्थानिक नेत्यांनी या बंदीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रशासनाकडे निर्णयाचा आधार सार्वजनिक करण्याची मागणी केली. भविष्यात या प्रकरणाच्या निर्णयांची पारदर्शकता राहील अशी अपेक्षा आहे.