dimagi naxal janata party : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना काही लोकांसाठी ‘दिमागी नक्सल’ असा शब्दप्रयोग केला होता. शस्त्र हातात घेऊन लढणारे नक्षलवादी संपले असले तरी काही ‘दिमागी नक्सल’ तरुणांना चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘दिमागी नक्सल जनता पार्टी’ या नावाचे एक नवीन पेज चर्चेत आले आहे. यापूर्वी चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख ‘कॉक्रोच’ असा केल्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाचे पेज सुरू झाले होते. त्यानंतर आता ‘दिमागी नक्सल जनता पार्टी’च्या माध्यमातून सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नागपूर : निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, 260 विद्यार्थ्यांचे नोंदवले जबाब
‘दिमागी नक्सल जनता पार्टी’च्या पेजने 4 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला : ‘दिमागी नक्सल जनता पार्टी’च्या नावाने Instagram आणि X या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, हे पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याला मोठ्या संख्येने फॉलोअर्स मिळाले. हा मजकूर तयार केला जात असताना Instagram वरील पेजला 218K फॉलोअर्स मिळाले होते आणि फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर X वरील या अकाउंटचे 420K फॉलोअर्स झाले आहेत.
हेही वाचा : पुणे : घरात एकट्या असलेल्या मुलीवर शेतात नेऊन अत्याचार अन् मर्डर, 'त्या' चुकीने आरोपी सापडला
ADVERTISEMENT





