नागपूर : निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, 260 विद्यार्थ्यांचे नोंदवले जबाब

योगेश पांडे

नागपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विशेष पथकाने 260 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

ADVERTISEMENT

Nagpur News
Nagpur News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

point

260 विद्यार्थ्यांचे नोंदवले जबाब

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील एका निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार आणि छळ झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आश्रमशाळेतील एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असून, काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका विद्यार्थ्याचेही लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची वाच्यता होताच कोंढाळी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

आश्रमशाळांमधील विद्यार्थी असुरक्षितच

याप्रकरणी पोलिसांनी राजेश मुलचंद मालापुरे (वय 44) या संशयिताविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो), बाल न्याय कायद्याचे कलम 75 आणि ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास कोंढाळी पोलिसांकडून वेगाने केला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात  संताप व्यक्त केला जात असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : पुणे : घरात एकट्या असलेल्या मुलीवर शेतात नेऊन अत्याचार अन् मर्डर, 'त्या' चुकीने आरोपी सापडला

260 जणांचे जबाब

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सखोल चौकशीचे आदेश दिले. आदेश मिळताच प्रशासनाच्या विशेष पथकाने थेट आश्रमशाळेत पोहोचून तेथे वास्तव्यास असलेल्या सर्व 260 विद्यार्थी-विद्यार्थिनींशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपीने इतर कोणत्याही मुलांसोबत असा प्रकार केला आहे का, याचा शोध घेणे हा या चौकशीचा मुख्य उद्देश आहे.

हे ही वाचा : 'नवऱ्याच्या नोकरीसाठी 5 लाख आण..' बीडमध्ये विवाहितेसोबत घडलं भयंकर

विशेष तपास पथक

या विशेष तपास पथकात महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत बारकाईने पाहाणी करत आहेत. आश्रमशाळेतील इतर मुलांच्या मानसिक व शारीरिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.