‘त्यांच्या राजकीय बापांनी भाजपच्या…’, देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेचा (UBT) सवाल

भागवत हिरेकर

31 Jul 2023 (अपडेटेड: 31 Jul 2023, 02:26 PM)

गैरव्यवहार करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेवरून शिवसेनेने (युबीटी) काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Uddhav Thackeray's shiv sena hits out at devendra fadnavis

Uddhav Thackeray's shiv sena hits out at devendra fadnavis

follow google news

Devendra Fadnavis vs Shiv sena UBT : शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची ईडी मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्य सरकारच्या या निर्णयावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीसांना काही सवाल केले आहेत. (Uddhav Thackeray sena Raised questions over ed inquiry of officers from the education department)

हे वाचलं का?

शिक्षण विभागातील सचिव पदापासून ते कनिष्ठ पदापर्यंत गैरव्यवहारात अडकलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या घोषणेवर सामना अग्रलेखातून समाचार घेण्यात आलाय. शिवसेनेने (युबीटी) सुरुवातीलाच “महाराष्ट्रातील भ्रष्टाचार प्रकरणांबाबत गृहमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन”, असं म्हटलं आहे.

‘शिक्षण खात्यातील घाण साफ झालीये का?’

“नाशिकसह राज्यभरात सातत्याने उघडकीस आलेली शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे चौकशीसाठी ‘ईडी’कडे सोपवू अशी घोषणा फडणवीस यांनी केली. अधेमधे कोणी नाही थेट ‘ईडी’कडे. शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची बेहिशेबी मालमत्ता असेल तर ती जप्त केली जाईल असेही दणकट विधान फडणवीस यांनी केले. गेल्या दोनेक वर्षांत शिक्षण विभागातील बरेचसे बडे अधिकारी लाच घेताना सापडले. सचिव दर्जाचे अधिकारी, परीक्षा मंडळ, माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गैरव्यवहारप्रकरणी अटका व सुटका झाल्या. या सगळ्यांवरील कारवायांमुळे शिक्षण खात्यातील घाण साफ झाली काय? तर नाही. ही सर्व वरवरची कारवाई आहे”, असे सांगत या सगळ्या प्रकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

वाचा >> बायकोची हत्या, मेहुणीसोबत गाठला क्रूरतेचा कळस! सायको किलरने पोलिसांनाही फोडला घाम

“फडणवीस यांनी आता घोषणा केली, शिक्षण अधिकाऱ्यांची ‘ईडी’ चौकशी करू, पण समजा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत व ज्यांच्या अशा प्रकारच्या चौकश्या सुरूच आहेत अशा सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी व त्यांच्या राजकीय बापांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये ‘उडी’ घेतली तर या ईडी चौकश्यांचे भवितव्य काय? हा प्रश्न आहेच. बरं, गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार साफ करायचा आहे व त्यांनी तो केलाच पाहिजे, पण त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस दल आणि तपास यंत्रणा कार्यक्षम नाहीत का?”, असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरेंच्या शिवसेनेने केला.

दुग्धाभिषेक सुरू आहे का? फडणवीसांना सवाल

“विद्यापीठे, शिक्षण मंडळे यात होणाऱ्या घोटाळ्यांना राजकीय आशीर्वाद लाभतो तेव्हा सगळेच मुसळ केरात जाते. अशा अधिकाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या किंवा बढत्यांसाठी आमदार व मंत्री विशेष रस घेऊन काम करताना दिसतात. त्यामुळे जेव्हा असा एक अधिकारी पकडला जातो तेव्हा त्याची शिफारस करणाऱ्या संबंधित मंत्री किंवा आमदाराचे नावही समोर यायला हवे. बरं, भ्रष्टाचार फक्त या एकाच विभागात चालला आहे काय? नगर विकास, महसूल, आरोग्य, ऊर्जा, महिला-बालविकास, आदिवासी, सार्वजनिक बांधकाम, रस्ते अशा खात्यांत काय दुग्धाभिषेक सुरू आहे?”, असा हल्ला ठाकरेंच्या सेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर चढवला.

वाचा >> Sambhaji Bhide: ‘संभाजी भिडे अफजल खानाचे वंशज’, कुणी केली टीका?

“मिंधे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सात मंत्री व 31 आमदार असे आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत व मुश्रीफ वगैरे मंत्री तर तात्पुरत्या जामिनावर मोकळे आहेत. शिक्षण खात्यातला भ्रष्टाचार व मुश्रीफांच्या सहकारी बँका, सहकारी कारखाने यातील भ्रष्टाचारात असा कोणता फरक आहे? भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या इस्टेटी जप्त करू असे फडणवीस यांनी बजावले, पण मंत्रिमंडळात व सरकारला पाठिंबा देणाऱ्यांत असे अनेक तालेवार लोक आहेत, ज्यांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली. जरंडेश्वर वगैरे साखर कारखाना त्यात आहे”, सांगत शिवसेनेने (युबीटी) देवेंद्र फडणवीसांना घेरलं आहे.

‘भाजपची भूमिकाच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी’

“आता शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक वगैरे लोकांच्या इस्टेटी जप्त होतील व जे लोक नव्याने भाजप वॉशिंग मशीनमध्ये स्वतःला धुऊन घेत आहेत त्यांच्या इस्टेटी मोकळ्या होतील असे एकंदरीत दिसते. भावना गवळी, यशवंत जाधव, राहुल शेवाळे अशा अनेक आमदार, खासदारांवर ‘ईडी’च्या चौकश्या असताना त्या थांबवून त्यांना सरकारात घेऊन अभय दिले गेले. आता मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी वगैरेंना ‘ईडी’चा धाक दाखवला जात आहे. अशाने भ्रष्टाचाराचा कचरा साफ होईल असे वाटत नाही. गृहमंत्री फडणवीस किंवा त्यांच्या सरकारला वाटले म्हणून एखादा माणूस भ्रष्टाचारी व त्यांनी ठरवला तर तो संत किंवा सोवळा ही भूमिकाच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी आहे. महाराष्ट्रात नेमके तेच सुरू आहे! मनमानी पद्धतीने चौकश्या करून घेणे हा एक फार्स ठरल्याशिवाय राहणार नाही”, असा सूचक इशारा शिवसेनेने (युबीटी) देवेंद्र फडणवीसांना दिला.

    follow whatsapp