विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी?

मुंबई तक

27 Oct 2026 (अपडेटेड: 27 Oct 2026, 09:06 AM)

Maharashtra vidhan parishad result 2026 live updates : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार? जाणून घ्या निकालाचे ताजे अपडेट.

Maharashtra vidhan parishad result 2026 live updates

Maharashtra vidhan parishad result 2026 live updates

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE

point

महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी?

Maharashtra vidhan parishad result 2026 live updates : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी आज (दि.27) मतमोजणी होत आहे. शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधान परिषद निकाल 2026 LIVE 

छत्रपती संभाजीनगर पदवीधर विधानपरिषद निकाल

1. सतीश चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 

2. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) -

3. दिलीप घुगे , शिवसेना ( ठाकरे गट) -

पुणे पदवीधर विधानपरिषद निकाल

1. हर्षदा देशमुख-जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) -

2. स्मिता जाधव , भारतीय जनता पार्टी - 

पुणे शिक्षक मतदारसंघ  विधानपरिषद निकाल

1. कौस्तुभ गावडे , भारतीय जनता पक्ष - 

2. जयंत आसगावकर - काँग्रेस पार्टी - 

नागपूर विधानपरिषद निवडणूक निकाल

1. सुधाकर कोहळे, भारतीय जनता पार्टी -

2. अभिजीत वंजारी , काँग्रेस - 

3. नितेश कराळे, अपक्ष - 

अमरावती शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निकाल

1. आदिती पोहरे , काँग्रेस - 

2. किरण सरनाईक , महायुती 


नागपूर पदवीधर मतदारसंघात 64.76 टक्के मतदान

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत एकूण 2 लाख 55 हजार 603 मतदार होते. त्यापैकी 1 लाख 65 हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण 64.76 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर निकालाचे कल आणि अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल. पाच जागांवरील निकालातून कोणत्या राजकीय आघाडीला यश मिळणार, हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणीतील पुढील घडामोडी आणि निकालाचे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या.