..तर 2029 मध्ये 'त्या' नेत्यांना निवडून द्यायचं नाही, जरांगेंचा थेट इशारा

मुंबई तक

20 Oct 2026 (अपडेटेड: 20 Oct 2026, 03:12 PM)

Manoj Jarange Patil : "जो नेता, जो पक्ष मराठा समाजाच्या विरोधात जाईल तो नेता 2029 रोजी निवडणुकीत निव़डून द्यायचा नाही," असं वक्तव्य मराठा आंदोलक आणि नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुष्काळावर मनोज जरांगेंचं उपस्थितांना संबोधन 

point

'जेव्हा फाशी घ्यायची वेळ येते तेव्हा आपली किंमत दीड लाख रुपये'

Manoj Jarange Patil : "जो नेता, जो पक्ष मराठा समाजाच्या विरोधात जाईल तो नेता 2029 रोजी निवडणुकीत निवडून द्यायचा नाही," असं वक्तव्य मराठा आंदोलक आणि नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं. ते आज 20 ऑक्टोबर 2026 रोजी नारायणगडावरून दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी बोलताना मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या लढाईबाबतही भाष्य केले. आपल्याला ही लढाई लढायची असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बांगलादेशचं नाव घेत सत्ता बदलावर मोहन भागवत यांचं मोठं विधान

दुष्काळावर मनोज जरांगेंचं उपस्थितांना संबोधन 

सध्या राज्यात दुष्काळ असून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना शेतकऱ्यांची लढाई लढायची असल्याचे सांगितले. "शेतातील पिक गेलं, हाता-तोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीन, उस, कापूस जळून गेला. शेतकऱ्याच्या बांध्यावर देखील उभे राहू वाटत नाही. रानात बांधावर उभे राहिल्यानंतर उभं वारं सुटतंय आणि दोन महिन्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे," असं म्हणत त्यांनी दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. 

"पाणी लागलं तर एकमेकांना तांब्या भरून पाणी द्या, एकमेकांची मज्जा बघू नका. आपलं कोणीही नाहीये, सरकार देखील नाहीये. मी सांगतो की, आज पूर्ण संकटात शेतकरी आहे. कृषी तज्ज्ञांना बोलावतो, हा लढा लढण्यासाठी तुम्हाला देखील पुढे व्हावे लागेल. मला यातील कळत नाही म्हणून मी सांगत आहे. हा लढा इतक्या ताकदीने लढायचा की, शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये शेतकऱ्यांना मदत घ्यायची".  

'जेव्हा फाशी घ्यायची वेळ येते तेव्हा आपली किंमत दीड लाख रुपये'

"यांनी (सरकारने) शेतकऱ्यांना जर पाच हजार मदत दिल्यास, त्यातील आठ दिवस हे बँकेत येण्या जाण्यात वेळ जाईल. आठ दिवसच पेट्रोलचा 2 हजार रुपये खर्च लागेल, तसेच जेवणासाठी वेगळे पैसे भरावे लागतील मग यापैकी पैसे राहतील का? सांगा कोण आहे आपलं या दुनियेत? आणखी निवडून द्या यांना? कोण सरकार? जेव्हा फाशी घ्यायची वेळ येते तेव्हा आपली किंमत दीड लाख रुपये असते," असं मनोज जरांगे म्हणाले. 

''..तर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही"

"जगाला आपण पोसायचं, राज्याला आयकर आपण द्यायचा, जीएसटी आपण द्यायचा आणि बंगले यांचे मोठे झाले. नेमके कोणाची बाजू घेऊन बोलताय?", असं म्हणत त्यांनी उपस्थितांना प्रश्न उपस्थित केलेत. "जो माझ्या समाजाच्या नादाला लागेल त्याला मी पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

हे ही वाचा : नालासोपारा: गरबा खेळताना तरुणाने मुलीची काढली छेड, Video व्हायरल

पुढे ते म्हणाले की, "मी नारायण गडावरून सांगतो की, आम्ही खूप वेदना भोगल्यात. फक्त मराठा समाजाच्या मुला-मुलींनी शिक्षण घ्या आणि नोकरी करा. माझ्या समाजाला सांगणं आहे की, मुलांना शिकवा, खूप नरक यातना भोगलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला त्रास दिलाय," असं मनोज जरांगे म्हणाले.